आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Reconsider Decision To Release Convicts In Rajiv Gandhi Case News In Marathi

राजीव यांच्या मारेकर्‍यांच्या सुटकेवर फेरविचार करावा - व्ही. नारायणसामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुद्दुचेरी - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांची सुटका करण्याच्या निर्णयावर तामिळनाडू सरकारने फेरविचार करावा, असे आवाहन पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी केले.

हत्येच्या प्रकरणात अण्णा द्रमुककडून दुटप्पीपणा करण्यात येत असल्याचा आरोपही नारायणसामी यांनी केला. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एलटीटीईवर तत्काळ बंदी घालून संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्याचे काम अण्णा द्रमुकने केले होते. त्याचबरोबर प्रभाकरनला भारतात आणण्याची मागणीदेखील केली होती.

हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या नलिनीला पॅरोलवर सोडण्यासदेखील पक्षाने विरोध दर्शवला होता. परंतु आता मात्र निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी जयललिता यांनी दुटप्पीपणा करण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका नारायणसामी यांनी केली.

विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टात दया याचिकेतील विलंबाबद्दल तीन दोषी संथन, मुरुगन आणि पेरारीवलन यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित केली होती. त्यानंतर जयललिता सरकारने त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, केंद्र सरकारच्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयाने तिघांच्या सुटकेवर स्थगिती आणली आहे.