आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reconstruction Of Uttarakhand: Thousand Crores Declaration, Tenth Thousand Crores Hope

उत्तराखंड नवनिर्माण : हजार कोटींची घोषणा, दहा हजार कोटींची आशा, परंतु...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अब्जावधींचा निधी. उत्तराखंडच्या नवनिर्माणासाठी. परंतु हा पैसा योग्य पद्धतीने खर्च व्हावा, हीच एक चिंता आहे. निधीच्या खर्चावर निगराणी कशी ठेवण्यात यावी, यासाठी ‘दिव्य मराठी’ ने जगभरातील वेगवेगळी उदाहरणे वाचकांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न केला आहे.

निगराणी नसेल तर येईल घोटाळ्यांचा महापूर


आता दोनच मोठी कामे
कसा थांबेल पैशाचा दुरुपयोग?
बिहारमध्ये जुलै-ऑगस्ट 2004 मध्ये आलेल्या भीषण पुरात 90 टक्के पैसे घोटाळ्यात बुडाले होते. कॅगने पाटण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी गौतम गोस्वामी यांना अपहार केल्याबद्दल दोषी ठरवले होते.


कसा होईल निधीचा सदुपयोग?
2001 मध्ये गुजरात भूकंपानंतर पैशांचा योग्य वापर झाला. एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक व गुजरात सरकारच्या निधीतून भुजचा दोन वर्षांत कायापालट झाला. वर्ल्ड बँक याला केस स्टडी मानते.


जगभरात लागू असलेले चार उपाय
* दानशूर असावेत निगराणी प्रक्रियेत
पॅरिस जाहीरनामा : 2005 मध्ये पॅरिसमध्ये संयुक्त राष्ट्राच्या संमेलनात निधीच्या योग्य वापरासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली होती. त्यात निर्माण करणा-या संस्थेला मालकीहक्क देणे व दानशूर व्यक्तीला विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे महत्त्वाचे ठरवले.
* पंचायतींकडूनही फीडबॅक
डब्ल्यूएचओ मॉनिटरिंग टूलकिट : जागतिक आरोग्य संघटनेने ग्रामीण पातळीवर पंचायतींना निगराणीत सहभागी करण्याचा उपाय सुचवला आहे. पंचायतीच्या फीडबॅकवरून प्रभावीपणे निगराणी केली जाऊ शकते. ‘हू’ चे टूलकिट एक-एक पैशाचा हिशेब ठेवते.
* स्मार्टकार्डमुळे पारदर्शकता
छत्तीसगड पीडीएस मॉडेल : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे स्मार्टकार्डचा वापर करून रेशन दुकानातून वाण-सामान खरेदी करतात. त्याचा तपशील वेबसाइटवर नोंदवला जातो. दुकानदाराच्या साठवणुकीतून हे काम कमी होते.
* हातात नगदी पैसे देणे गरजेचे नाही
राष्ट्रीय आरोग्य विमा योजना : कामगार मंत्रालयाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी कॅशलेस विमा योजना सुरू केली आहे. आता ते खासगी रुग्णालयात उपचार करू लागले आहेत. वर्ल्ड बँकेने ही योजना अनेक देशांत लागू केली आहे.