आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान : पोलिस मुद्देमाल कक्षातून ५६ लाखांची रोकड, एके- ५६ व स्फोटके गायब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थानातील बहुचर्चित राजेंद्र मिर्धा अपहरण प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली ५६ लाख रुपयांची रोकड, एके - ५६ रायफलीसह स्फोटके व इतर साहित्य पोलिसांच्या मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आले होते; परंतु हा साठा गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
हा साठा पोलिसांनी २६ फेब्रुवारी १९९५ रोजी मालवीयनगर तसेच वैशालीनगरात गुंडासोबत चकमकीनंतर जप्त केला होता. या दोन्ही ठाण्यांच्या कक्षात तो ठेवण्यात आला होता, परंतु हा माल सध्या कुठे आहे याची ठाणे प्रमुखांना कल्पनाच नाही. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार मॉडेल टाऊन येथून एक हातगोळा, दोन एके - ५६ रायफली, ११ पेक्षा जास्त काडतुसे, चार डिटोनेटर्स, ६१ लाख ७० हजार १८० रुपये व इतर साहित्य होते. त्यापैकी पोलिसांनी रोख रक्कम व शस्त्रे मुद्देमाल कक्षात जमा केली होती.

पोलिसांनी त्यापैकी ५ लाख रुपये न्यायालयात जमा केले होते व सध्या या कक्षात फक्त २८ हजार रुपयेच आहेत. म्हणजे ५६ लाख रुपये व एक एके - ५६ रायफल गायब आहेत. आता पोलिसांना याबाबत काहीच कल्पना नाही. गेल्या आठ वर्षांत कक्षाच्या नोंदणी रजिस्टरमध्ये याचा काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही.
कोर्टाचे आदेश तरीही कारवाई नाही
अतिरिक्त सत्र न्यायालय -१२ च्या कोर्टाने तत्कालीन एका याचिकेवर जून २०१४ मध्ये पोलिस महासंचालकांना संबंधित कर्मचाऱ्यांच्याविरोधात एफआयअार दाखल करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्यानंतरही अद्याप न्यायालयात ऐवज सादर केला गेला नाही व दोषींविरोधात एफआयआर दाखल झाली नाही.
राेकड, स्फोटकांचा उल्लेख नाही
मालवीयनगर ठाण्याच्या ऐवज नोंदणी रजिस्टरमध्ये मिर्धा अपहरण प्रकरणी जप्त रक्कम ५.२८ लाख रुपये इतकीच दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात छाप्यमध्ये ६१ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती, तर वैशालीनगरमध्ये जप्तीच्या पंचनाम्यात स्फोटकांच्या सामग्रीचा कोणताही उल्लेख नाही. याची नोंद ठेवणाऱ्या मोहरीरची बदली झाली आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षांत मोहरीरची बदली झाल्यावर आधीचा प्रभारी मिर्धा अपहरण कांडातील जप्त केलेली रोख रक्कम व इतर सामग्रीचा चार्ज न देताच कार्यभार सोपवतो.
गायब युरेनियम साठाही सापडेना
पोलिसांनी राजेंद्र मिर्धाला दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवल्यानंतर वैशालीनगरमध्ये एका घरामधून विनापरवाना एके-५६ रायफल, २१० काडतुसे, १२.८५ किलोग्रॅम स्फोटके, स्फोट करणारा रिमोट कंट्रोल डिव्हाइस, चामड्याचा एक पाऊच व त्यात ठेवण्यात आलेले १.५०२ किलोग्रॅम युरेनियमदेखील जप्त करण्यात आले होते.

वैशालीनगर ठाण्यात रायफल, स्फोट घडवणारा रिमोट कंट्रोल डिव्हाइस व काडतुसे जप्त केली गेली होती. युरेनियम व स्फोटकांचा साठा गायब असून त्याचा अारोपपत्रात उल्लेख आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...