आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स पॉवर औषधीसाठी आहे याची डिमांड, किंमत वाचून चकित व्हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ : आशिया पॅसिफिक संघटना आणि इंटरपोलने फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून पेंगोलिन प्राण्याच्या तस्करीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची लिस्ट मागवली आहे. जगभरात पेंगोलिनची मागणी सेक्स पॉवर वाढवणाच्या औषधीसाठी केली जाते. याच कारणामुळे पेंगोलिनच्या बेकायदा शिकारीच्या घटना समोर येत आहेत. हा प्राणी मध्य प्रदेशातील जंगलात आढळून येतो. जेई तमांग नामक तस्कराला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. परंतु जामीन मिळाल्यानंतर तो फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार तो आता युरोपमध्ये लपलेला आहे.

काय आहे तमांग प्रकरण...
- जेई तमांगला पेंगोलिनच्या तस्करी आरोपात मध्यप्रदेश एसटीएफ वाईल्ड लाईफने ऑक्टोबर 2015 मध्ये दिल्लीमधून अटक केली होती.
- आरोपीला आयपीएस आणि वन्यप्राणी कायद्याच्या विविध कलमाखाली तुरुंगात टाकण्यात आले होते.
- तमांगने होशंगाबाद जिल्हा कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आणि त्याला जामीन मिळाला.
- त्यानंतर एसटीएफने जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली.
- फेब्रुवारी 2016 मध्ये तमांगचा जामीन रद्द करण्यात आला. त्यानंतर एसटीएफ तमांगने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले परंतु तेथे तो नव्हता.
- एसटीएफने तमांगच्या शोधात अनेक ठिकाणी छापे मारले. त्यानंतर इंटरपोलची मदत घेतली.
- इंटरपोलला तो युरोपमध्ये असल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर तमांगसाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली.

10 राज्यातून आरोपींना अटक करण्यात आली..
- एसटीएफ वाईल्ड लाईफने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत 10 राज्यांमधून 113 आरोपींना अटक केली आहे. यामधील काही आरोपी विदेशी आहेत. हे सर्व आरोपी सध्या बालाघाट जेलमध्ये कैद आहेत.
- आणखी 30 आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. इतर राज्यातील 8 पेक्षा जास्त आरोपींसाठी वॉरंट काढणायत आले आहे.
- ही देशातील सर्वात मोठी कारवाई मानण्यात येत आहे. आशिया पॅसिफिक संघटना आणि इंटरपोलने फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून तस्करीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची लिस्ट मागवली आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, पेंगोलिन शिकार प्रकरण समोर आल्यानंतर कसा बसला वनविभागाला धक्का...
बातम्या आणखी आहेत...