आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेश्यांच्या मुली काढताहेत आईवर माहितीपट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - ठिकाण- रेडलाइट परिसर. पन्नासेक मुली जमलेल्या. काही पटकथा लेखनाच्या कामात व्यग्र. काही मुली कॅमेर्‍यासमोर धाडसाने उभ्या. यातील काही कॅमेर्‍यासमोर कथा सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. केवळ पंधरा वर्षांच्या आतील मुली आपल्याच आईचा करपलेला आयुष्यपट व्हिडिओतून मांडण्यासाठी धडपडत आहेत.

गेल्या आठवड्यात वेश्या वस्तीत चार दिवसांची व्हिडिओ मेकिंग कार्यशाळा पार पडली. त्यात मुली आपले दाहक वास्तव जगासमोर आणण्याच्या प्रयत्न करताना दिसून आल्या. दिग्दर्शक असीम आशा यांनी ही कार्यशाळा आयोजित केली होती. मी अभ्यास करून माझ्या आईला मदत करू इच्छिते. माझ्या आईला किती अडचणी येत आहेत, याची कल्पना मी तयार केलेल्या व्हिडिओमधून सहजपणे येऊ शकेल, असे एका 14 वर्षीय मुलीने सांगितले.

काय होता उद्देश ?
वर्षानुवर्षे दुर्लक्षिलेल्या समुदायातील मुलांचा आवाज दडपलेला होता. या उपक्रमातून अशा मुलांना आशेने वाटचाल करता येऊ शकेल. ही चित्रपट शैली व तंत्र शिकल्यानंतर त्यांना भविष्यासाठी फायदा व्हावा, हा कार्यशाळेचा उद्देश होता.

देहभान येईल
इतर वेश्या वस्तीमधील मुलांना हा माहितीपट पाहून देहभान येईल, अशी ‘अपने आप वुमन वर्ल्डवाइड’च्या अध्यक्षा रुचिरा गुप्तांची अपेक्षा आहे. गुप्तांची एनजीओ व फ्रान्सच्या अलायन्स फ्रान्काइस हे या वस्तीमधील मुलांच्या जनजागृतीचे काम करतात.