आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reddy's Minister Council Oppsose Separation Of Andhra

रेड्डी यांच्या मंत्रिमंडळाचा आंध्राच्या विभाजनाला विरोध,विधानसभा अध्‍यक्षांकडे शपथपत्र सादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - तेलंगणा राज्यनिर्मितीच्या विधेयकावरील कोंडी कायम असून बुधवारी मुख्यमंत्री एन.किरणकुमार रेड्डी यांच्या मंत्रीमंडळाने व सीमांध्र भागातील आमदारांनी आंध्राच्या विभाजनाला विरोध करणारे शपथपत्र विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले. हे शपथपत्र राष्‍ट्रपतींकडे पाठवावे अशी विनंती त्यांनी अध्यक्ष नांदेन्दला मनोहर यांच्याकडे केली. तत्पूर्वी, आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकावर विविध पक्षांचे आमदार परस्परविरोधी भूमिकेवर ठाम राहिल्याने बुधवारी विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. यामुळे विधानसभा दोन वेळेस तहकूब करावी लागली.
सकाळी 9.00 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर तेलंगणा समर्थक व अखंड आंध्र समर्थक आमदारांनी आपापल्या जागेवर उभे राहून घोषणाबाजी केली. तेलंगणाच्या आमदारांनी कामकाज रोखून धरले. मुख्यमंत्र्यांनी नियम 77 अंतर्गत विधेयक फेटाळण्याची दाखल केलेली नोटीस रद्द करण्याची मागणी तेलंगणा समर्थकांनी केली. त्याच वेळी अध्यक्ष नदेंदला मनोहर यांनी सदस्यांना जागेवर बसण्यासाठी वारंवार आवाहन केले. विधेयक मंजुरीसाठी केवळ दोन दिवस शिल्लक असल्यामुळे सर्वांनी चर्चेत भाग घ्यावा तसेच सदस्यांना लेखी म्हणणे मांडावे, असे त्यांनी सांगितले. मात्र, आमदार माघार घेण्याच्या स्थितीत नसल्यामुळे अखेर अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले. यानंतर दोन तासांनंतर पुन्हा कामकाजास सुरुवात झाली. मात्र, सत्ताधारी व विरोधक आपल्या म्हणण्यावर ठाम होते.