आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Regional Parties Alliance Make Political Changes Sitaram Yechuri

प्रादेशिक पक्षांच्या आघाडीतून राजकीय परिवर्तन - सीताराम येचुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांचिपुरम - माकपने अण्णा द्रमुकसारख्या प्रादेशिक पक्षांसोबत मजबूत आघाडी स्थापन केल्यास भ्रष्टाचार आणि मूलतत्त्ववादासारखे राक्षस हद्दपार करता येतील. एकट्या नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही, असे माकप नेते सीताराम येचुरी यांनी सांगितले.
आमच्या पक्षाने अण्णा द्रमुकसारख्या मजबूत प्रादेशिक पक्षाबरोबर आघाडी केल्यास भ्रष्टाचार आणि मूलतत्त्ववाद उखडता येणार नाही, असे येचुरी यांनी रविवारी रात्री एका सभेत सांगितले. येचुरी यांना या वेळी 8 लाख 56 हजार रुपये निवडणूक निधी सुपूर्द करण्यात आला. औद्योगिक घराण्यांकडून निधी न घेण्याचे धोरण कायम राहील, असे येचुरी यांनी स्पष्ट केले. जी औद्योगिक घराणी निवडणूक निधी देतात त्यांना लोकपालाच्या कक्षेत आणण्यास भाजप तसेच काँग्रेसनेही नकार दिला आहे. या मुद्द्यावर अण्णा द्रमुक आणि त्यांचे सहकारी पक्ष संसदेत डाव्या पक्षांबरोबर होते. यूपीएचा माजी घटक पक्ष द्रमुकने या प्रस्तावाविरोधात मतदान केले होते.
2009 मध्ये डाव्यांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसने भाजपला रोखण्यात यश मिळवले. मात्र, त्या पक्षाने किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी न करता लोकांना वा-यावर सोडले. अन्न सुरक्षा आणि शिक्षणाच्या हक्कासाठी अपु-या निधीची तरतूद करण्यात आले. टूजी आणि कोळसा घोटाळ्यातून सामान्यांच्या संपत्तीवर डल्ला मारण्यात आल्याचा आरोप येचुरी यांनी केला.