नीम का थाना (राजस्थान) - देशातील मुलींचा जन्मदर सर्वात कमी असलेल्या राज्यांपैकी राजस्थान एक आहे. येथील चला गावातील लोहार काम करणारे मुन्ना आणि त्यांची मुलगी रेहाना यांनी आपल्या कर्तृत्वाने मुलींना ओझे समजणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. वडिलांसोबत लोहार काम करताना घनाचे घाव घालणारी रेहानाने 12वीत 96 टक्के गुण मिळविले. त्यानंतर कॉलेजमध्येही ती टॉपर राहिली आता गावाने तिला मुलींच्या शिक्षणाची ब्रँड अॅम्बेसिडर केले आहे. रेहानाने आतापर्यंत 24 मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले असून आता ती IAS ची तयारी करीत आहे. शुन्यापासूनचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
रेहानाला व्हायचे IAS
- तप्त लोखंडावर घनाचे घाव घालणारी मुलगी ते IAS ची तयारी करणारी रेहाना हा प्रवास सुरू झाला 20 वर्षांपूर्वी.
- मुन्ना लोहार पत्नी जमीला यांच्यासोबत चला गावात कामधंद्याच्या शोधात आले.
- त्यांनी येथे लोखंडी अवजारे तयार करण्याचे काम सुरु केले. पै-पै जमवून त्यांनी मुलीला शाळेत प्रवेश मिळवून दिला.
- वडिलांच्या कष्टाचे चीज करत लेकीनेही मन लावून अभ्यास केला. रेहानाने रात्रंदिवक एक करुन 2012-13 मध्ये 12 वीत 96 टक्के गुण मिळविले. कॉलेजमध्ये 70 टक्के गुण संपादन करत टॉप केले.
- रेहाना सध्या इंग्रजी साहित्यात एमए करत आहे. त्यासोबत गावाने तिला ब्रँड अॅम्बेसिडर केले आहे.
- गावचे सरपंच बीरबल काजल सांगतात, रेहाना गावातील मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देते. त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करते. रेहानाने आतापर्यंत 24 मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.
- इंग्रजीमध्ये एमए करत असतानाही रेहानाने वडिलांना लोहार कामात मदत करणे बंद केलेले नाही. अजूनही ती वडिलांसोबत तप्त लोखंडावर घनाचे घाव घालून त्याला आकार देण्याचे काम करत असते.
गावातील लेकी-सूनांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करते
- गावातील मुली आणि सूनांसाठी रेहाना आदर्श आहे. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि आपलेही शिक्षण सुरु ठेवणे हे रेहानाचे नित्याचे काम झाले आहे.
- शाळा सोडलेल्या 24 मुलींना रेहानाने प्रोत्साहन देऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.
- दुसऱ्या गावातून चलामध्ये सून म्हणून आलेल्या 17 मुली रेहानासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत.
रेहानाच्या IAS कोचिंगचा खर्च NGO करणार
- चला गावातील मुलगी आयएएस व्हावी ही गावकऱ्यांचीही इच्छा आहे. त्यासाठी हिमालया ट्रस्ट तिला आर्थिक मदत करण्यास तयार आहे.
- एनजीओच्या अधिकाऱ्यांनी रेहानाला आएएस कोचिंगसाठी दिल्ली किंवा इतर ठिकाणी पाठवण्याचा खर्च उचलण्याची तयारी दाखविली आहे.
- रेहाना सध्या याच संस्थेच्या क्लासमध्ये मोफत कोचिंग घेत आहे.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या, जिद्दी रेहानाची कहाणी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)