आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Relative Searching Their Own People In Uttarakhand

महाप्रलयानंतरची गोष्‍ट : जिवलगांच्या शोधासाठी नातेवाईक उत्तराखंडमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - नैसर्गिक संकटाने अजूनही एक हजारावर नागरिकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून वेगळे ठेवले आहे. त्यांच्या शोधाचे सरकारी प्रयत्न जणू थकले आहेत.


काही भागात आगामी काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. म्हणूनच केदारनाथ, रामबाडा भागात बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम बेपत्ता असलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी केदारनाथ भागात शोधाची पायपीट करण्याचा निर्णय घेतला आहे. केदारनाथ, रामबाडा भागात प्रचंड ढिगारे आहेत. ते ढिगारे उपसून आपल्या नातेवाइकाचे मृतदेह शोधून किमान त्यांच्यावर धार्मिक पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्याची काही लोकांची इच्छा आहे. दरम्यान, बेपत्ता नागरिकांचे नातेवाईक त्यांच्या शोधासाठी मोहीम राबवणार असल्याची आपल्याला माहिती नाही; परंतु नातेवाइकांनी आमच्याशी संपर्क साधला तर त्यांच्या शोधासंबंधीच्या सल्ल्यावर विचार केला जाऊ शकतो, असे जिल्हाधिकारी दिलीप जवळकर यांनी सांगितले.


‘मारुती’कडून 1.56 कोटींची मदत
मारुती सुझुकी इंडिया कंपनीने उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी 1.56 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मारुतीने ही रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.