आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio डेटा लीक प्रकरणात राजस्थानमधून एकाला अटक, एका रात्रीतून व्हायरल झाली होती बातमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुरु (राजस्थान) - सोशल मीडियावर दोन दिवसांपासून रिलायन्स जिओच्या 12 कोटी ग्राहकांचा डेटा लीक झाल्याची बातमी हातोहात पसरत होती. मंगळवारी राजस्थान पोलिसांनी या प्रकरणी इम्रान छिम्पा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिस या संशयिताची कसून चौकशी करत आहेत. ट्विटरवर काही रिलायन्स ग्राहकांनी दावा केला होता की magicapk.com या वेबसाइटवर जिओ नंबर अपलोड केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तिथे मिळते. गेल्या आठवड्यात अॅक्टिव्हेट झालेल्या नंबरचीही माहिती मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता. 
 
- एका न्यूज एजन्सीने स्थानिक पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे, की मंगळवारी सकाळी इम्रान छिम्पा याला पकडण्यात आले आहे. राजस्थानमधील सुजानगड येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारीही सूजानगडला पोहोचले आहे. त्यासोबत मुंबई पोलिसांचे एक पथकही येथे पोहोचले.
- मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरुनच ही कारवाई करण्यात आली. 
- इम्रान आणि त्याचे साथीदार सुजानगड ऑनलाइन डॉटकॉम नावाने एक कंपनी चालवत होते. 
 
कंपनीने डेटा लीक होण्याचा आरोप फेटाळला 
- DainikBhaskar.com ने रिलायन्स जिओकडे डेटा लीक होण्याबाबत विचारणा केलीहोती. Jio च्या प्रवक्तांनी डेटा लीक होण्याचे वृत्त फेटाळले होते. जी माहिती लीक होण्याचा दावा केला जात आहे ती खरी नसल्याचे ते म्हणाले होते. 
 
केव्हा समोर आली डेटा लीक होण्याची माहिती 
रविवार सायंकाळपासून सोशल मीडियावर चर्चा 
- रविवारी सायंकाळपासून जिओ ग्राहकांचा डाटा लीक झाल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. ट्विटर, फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून मेसेजेस शेअर केले जाऊ लागले. 'तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुमचा डाटा लीक होत आहे. magicapk.com या साइटवर तुमचा मोबाइल क्रमांक टाकल्यास तुम्ही जिओ नंबर घेण्यासाठी दिलेली कॉन्फिडेंशियल माहिती दिसायला लागते.'
- हे मेसेज शेअर झाल्यानंतर या साइटवर ट्राफिक एवढी वाढली की रात्री 11 वाजतापासून साइट क्रॅश झाली आहे. 
- एका इंग्रजी वेबसाइटचे संपादक वरुण क्रिश यांनी स्वतःचा अनुभव शेअर केला आहे. ते म्हणाले, साइटवर एक सर्च बॉक्स देण्यात आला होता. तिथे जिओचा नंबर टाकल्यानंतर यूजरची माहिती समोर येत होती. 
बातम्या आणखी आहेत...