आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Religion Conference At Chhattisgad, News In Marathi

छत्तीसगडमधील कवर्धामध्ये धर्म संसदचे आयोजन; चर्चेसाठी साई ट्रस्टला निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवर्धा / नाशिक- शिर्डीतील साईबाबांच्या अस्तित्वाबाबत आता धर्म संसदेत चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी शिर्डीच्या साई ट्रस्टलाही निमंत्रण दिले आहे. पुढील महिन्यात 24 व 25 ऑगस्ट रोजी छत्तीसगडमध्ये कवर्धा येथे ही धर्म संसद होणार आहे.

शंकराचार्य यांनी सांगितले की, चातुर्मासादरम्यान 24 व 25 ऑगस्ट रोजी कवर्धा येथे धर्म संसद भरणार आहे. त्यात शिर्डीच्या साईबाबा मंदिर व सनातन धर्माच्या साधुसंतांना बोलावण्यात येणार आहे. शंकराचार्यांनी म्हटले की धर्म संसदेत शास्त्राच्या माध्यमातून दोन्ही पक्ष साईबाबांच्या अस्तित्वासंदर्भात आपापली मते मांडतील व ती सिद्ध करतील. बैठकीत झालेला निर्णय दोन्ही पक्ष मान्य करतील. शंकराचार्यांच्या म्हणण्यानुसार साईबाबांसंदर्भात व त्यांच्या वक्तव्याने निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी ही धर्म संसद आयोजित करण्यात आली आहे.
यात साई ट्रस्टला निमंत्रण देण्याची जबाबदारी दंडी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शंकराचार्यांनी स्पष्ट केले की, शृंगेरी शंकराचार्य व पुरीच्या शंकराचार्यांचे प्रतिनिधी, निंबकाचार्य महाराज, रामानंदाचार्य, श्रामानंदाचार्य, रामनरेशाचार्य महाराज, मध्व संप्रदायातील विश्वेश्वरतीर्थ महाराज, रामानुजाचार्य महाराज यांच्यासह 13 आखाड्यांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. भारतीय लोक तर्क, उपलब्ध पुुरावे यानुसार मांडलेल्या तथ्यावर जरूर विश्वास ठेवतील.

निमंत्रण मिळाल्यावर विचार करू
साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी स्पष्ट केले की शंकराचार्य संस्थानकडून 23 जूनपर्यंत कोणतेही निमंत्रण अथवा पत्र प्राप्त झालेले नाही. निमंत्रण मिळेल तेव्हा विचार करू.