आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Religion Conference News In Marathi, Kawardha Chattisgarh

धर्म संसदेत साईभक्तांना बाजूच मांडू दिली नाही, निषेधासाठी आले होते साईभक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवर्धा (छत्तीसगड)- येथे भरलेल्या धर्मसंसदेत दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती मंचावर विराजमान होते. दिल्लीहून आलेले साईभक्त अशोक कुमार व अहमदाबादचे मनुष्य मित्र मंचावर आले. ते बोलत असताना आखाड्याचे साधू उठले व त्यांनी दोन्ही साईभक्तांना घेराव घातला. त्यांचे कपडे ओढून त्यांना धक्काबुक्की केली. त्यांना बाहेर काढण्यात आले.

या घटनेबाबत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती म्हणाले, "साईभक्तांनी मंचावर तर्कहीन मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. साईबाबा देव आहेत हे भक्त सिद्ध करू शकले नाहीत. त्याचे कोणतेही पुरावे ते देऊ शकले नाहीत.' दिल्लीचे साईभक्त अशोक कुमार यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, "मी साई ट्रस्टचे प्रतिनिधित्व करत नाही. इतर कोणत्याही संस्थेचा मी प्रतिनिधी नाही. कवर्धामध्ये धर्मसंसद सुरू असून त्यात साईबाबांना देव न मानण्यासंबंधीचा प्रस्ताव संमत होणार असल्याचे समजल्याने मी येथे आलो. मला यामुळे दु:ख झाले व त्याची निंदा करण्यासाठी मी येथे आलो. ' दुसरे समर्थक मनुष्य मित्र म्हणाले, "गोहत्या बंदीच्या मुद्द्यावर आपण बेमुदत उपोषण करू शकतो. धर्मसंसदेत आलेल्या साधूंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सोबत यावे.’

त्यावर काही साधू त्यांना चला उपोषणाला बसून दाखवा, असे म्हणत त्यांन ढकलत शंकराचार्यांकडे नेऊ लागले. काही वेळ त्यांना मंचावरच बसवून ठेवण्यात आले. नंतर पोलिस बंदोबस्तात बाहेर नेण्यात आले.

पाच साईभक्तांना मंचावर येऊच दिले नाही
येथे आलेल्या इतर पाच साईभक्तांनी एक चिठ्ठी धर्मसंसदेत सादर केली. त्यात म्हटले होते की, साईबाबा देव नाहीत तर धर्मसंसदेने सांगावे की, भगवान, गुरू, अवतार व संतांची व्याख्या काय आहे? सर्वात आधी मीडिया प्रभारी राजेश जोशींशी संपर्क साधण्यात आला. ही गोष्ट धर्मसंसदेपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना तुम्ही एका जागी बसा, योग्य वेळी तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. पण त्यांना नंतर संधी दिलीच गेली नाही.