आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिश्चन धर्म स्विकारालेल्या पाच कुटुंबावर बिहारमध्ये बहिष्कार, विहिंपने केली 'घर वापसी'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भागलपूर - बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या पाच कुटुंबांवर गावाने बहिष्काराची धमकी दिली आहे. पंचायतीने त्यांना गावातून मिठ-मिरचीही मिळणार नसल्याचे फर्मान सुनावले. गाव बहिष्कार टाकणार या भीतीने ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या पाच पैकी तिनी कुटुंबांनी धर्मात प्रवेश केला आहे. विश्व हिंदू परिषदेने 'घर वापसी' कार्यक्रमातून त्यांचे धर्मांतर केले आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भागलपूर जिल्ह्यातील बुद्धुचक येथील बढैया गावातील ही घटना आहे. येथील पाच कुटुंबांनी धर्मांतर केल्यानंतर पोलिस, माजी आमदार, बीडीओ आणि गावातील प्रमुख यांनी बुधवारी दिवसभर गावात तळ ठोकला होता. ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या कुटुंबांनी तो त्यागला पाहिजे यावर गावकरी अडून बसले होते. दोन्ही बाजूंनी दिवसभर चर्चेच्या फेर्‍या झाल्या.
विश्व हिंदू परिषदेने केली घर वापसी
विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक प्रमुख राकेश सिन्हा यांनी सांगितले, की मदन कुमार यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यांचे पथक संबंधीत गावी जाऊन आले आहे. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या लोकांना अनेक पद्धतीने समजावून सांगितले आणि त्यानंतर राधे मंडल, सुनीता देवी व ललिता देवी यांच्या कुटुंबियांची घर वापसी केली आहे. इतर कुटुंबांचेही लवकरच घर वापसी करु असे ते म्हणाले. विहिपच्या पथकाने ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या लोकांना गंगा स्नान करायला लावले आणि त्यानंतर दुर्गा मंदिरात पुजा-अर्चना केली.