आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Remove Leaves Symbol From Amma Water Bottles: EC

‘अम्मां’चे चित्र काढल्याने मिनरल वॉटरचा खप घटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मदुराई - निवडणूक आयोगाने अम्मा मिनरल वॉटरच्या बाटलीवरील दोन पानांचे चिन्ह आणि मुख्यमंत्री जयललिता यांचे चित्र काढण्याचा आदेश बजावल्यानंतर पाण्याच्या बाटलीची विक्री 50 टक्क्यांनी घटली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

अम्मा मिनरल वॉटरच्या खपात तिरुचिरापल्ली आणि मदुराईमध्ये कमालीची घट झाली आहे. विक्रीत वाढ होण्यासाठी तामिळनाडू सरकारचा लोगो वापरण्याचा सल्ला देण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. लेबल नसलेल्या या मिनरल वॉटरकडे लोक साशंकतेने पाहतात. परराज्यातून आलेले पर्यटकही पाण्याच्या शुद्धतेबाबत संशय घेतात. अम्मांच्या लोगोंनी विकल्या जाणार्‍या पाण्याच्या बाटल्या तसेच हॉट केक्सच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
असे असले तरी खासगी कंपन्यांच्या मिनरल वॉटरला सध्या मदुराईमध्ये मागणी वाढली आहे, अशी माहिती स्थानिक
दुकानदाराने दिली.