आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानच्‍या गोळीबाराला जशास तसे उत्तर द्या, भारतीय सैन्‍याला मिळाली सूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पाकिस्‍तानी सैन्‍याकडून वारंवार होणा-या शस्‍त्रसंधीच्‍या उल्‍लंघनाला जशास तसे उत्तर देण्‍याचे निर्देश भारतीय सैन्‍याला देण्‍यात आले आहेत. सीमेपलिकडून होणा-या प्रत्‍येक हालचालीवर लक्ष ठेवून जशास तसे उत्तर द्यावे, असे निर्देश सैन्‍याच्‍या वरिष्‍ठ अधिका-यांनी दिले आहेत. दरम्‍यान, कुपवाडा येथे घूसखोरीचा प्रयत्‍न करणा-या एका घूसखोराला ठार मारण्‍यात आले आहे.

सैन्‍याच्‍या वरिष्‍ठ सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांना पूर्णपणे स्‍वातंत्र्य देण्‍यात आले आहे. पाकिस्‍तानकडून शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन झाल्‍यास तत्‍काळ प्रत्‍युत्तर देण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. त्‍यासाठी नवी दिल्‍लीतून परवानगी मिळण्‍याची प्रतिक्षा करण्‍याची गरज नाही.

गेल्‍या 24 तासांमध्‍ये पाकिस्‍तानकडून 2 वेळ शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन करण्‍यात आले आहे. जम्‍मू आणि काश्मिरमध्‍ये पुंछ आणि कठुआ भागातील सीमेवर पाकिस्‍तानी सैन्‍याने गोळीबार केला. भारतीय सैनिकांनीही त्‍याचे प्रत्‍युत्तर दिले.

भारत आणि पाकिस्‍तानमध्‍ये 2003 मध्‍ये शस्‍त्रसंधीचा करार करण्‍यात आला होता. परंतु, दहशतवाद्यांनी भारतात घूसखोरी करण्‍यासाठी पाकिस्‍तानी सैनिक अनेकवेळा गोळीबार करतात. यावर्षी जुलैमध्‍येच 5 वेळा शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन झाले आहे.

सैन्‍याच्‍या वरिष्‍ठ सुत्रांनी सांगितले, की पाकिस्‍तानला लागून असलेल्‍या सीमेवर प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषा स्‍पष्‍ट करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे शस्‍त्रसंधीचे जशास तसे उत्तर दिले जाईल. परंतु, चीनबाबत कूटनितीचा वापर करण्‍यात येईल. चीनला लागून असलेली सीमा अस्‍पष्‍ट आहे. त्‍यामुळे चीनला वेगळ्या पद्धतीने हताळावे लागेल. पर्वतीय भागासाठी विशेष स्‍ट्राईक कोरला मंजूरी देण्‍यात आली आहे. पाच वर्षांमध्‍ये याबाबत प्रक्रीया पूर्ण होईल.