आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी स्पेशल : 24 दिवसांत 8 ठिकाणी थांबून लंकेहून अयोध्येत पोहोचले होते श्रीराम, असा होता प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 30 ऑक्टोबरला देशभरात आणि जगभरात दिवाळी साजरी होत आहे. त्यानिमित्ताने divyamarathi.com तुम्हाला प्रथमच प्रभू श्रीरामाच्या पुष्पक विमानाच्या प्रवासादरम्यानच्या भेट दिलेल्या 8 ठिकाणांचा ग्राऊंड रिपोर्ट सांगणार आहे. या ८ ठिकाणी भेट देत श्रीराम 7090 वर्षांपूर्वी रावणाचा वध करून लंकेहून अयोध्येत परतले होते. त्यानंतर त्याठिकाणी पहिली दिवाळी साजरी झाली होती. या प्रवासाला जवळपास 24 दिवस लागले होते.

या सर्व ठिकाणांचा उल्लेख रामायणातही आहे. या रिपोर्टसाठी आम्ही या सर्व ८ ठिकाणांना भेटी दिल्या. श्रीरामांच्या या प्रवासाच्या पुराव्यांची माहिती घेतली. त्यांच्याशी संबंधित कथा जाणून घेतल्या. फोटो मिळवले. तसेच ही माहिती त्याठिकाणचे महंत, इतिहासकार आणि रामायण-वेदांचे जाणकार यांच्याशी चर्चा करून तपासून घेतली. या सर्वामागचा उद्देश रावणाच्या वधानंतर 7090 वर्षांपूर्वीच्या पहिल्या दिवाळीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, रावणाचा वध केल्यानंतर लंकेहून अयोध्येत परतताना कुठे कुठे भेट दिली होती श्रीरामांनी.. कशी साजरी झाली होती 7090 वर्षांपूर्वी पहिली दिवाळी..

या रिपोर्टमध्ये दिलेल्या तारखा इंडियन गव्हर्नमेंटच्या सायन्स मिनिस्ट्रीने प्रमाणित केलेल्या 'इन्स्टीट्यूट ऑफ साइंटिफिक रिसर्च ऑन वेदाज' (आयसर्व्ह) च्या रिसर्चमध्ये समोर आल्या आहेत. रामायण लिहिलेल्या काळातील ग्रह, नक्षत्र, तारांगण, यांच्या स्थितीच्या आधारे नासाच्या वेद स्पेशल 'प्लॅटिनम गोल्ड' सॉफ्टवेअरमधून तारखा घेतल्या आहेत. आयसर्व्ह डायरेक्टर सरोज बाला यांनी सांगतले की, 7089 वर्षांपूर्वी 4 डिसेंबर 5076 Bला रावणाने रामाचा वध केला होता. त्यानंतर विविध ठिकाणी भेट देत ते 29 व्या दिवशी 2 जानेवारी 5075 BC ला अयोध्येत परतले होते.

कंटेट कॉट्रीब्युटर : अयोध्येहून रवी श्रीवास्तव, चित्रकूटहून झिशान, अलाहाबादहून प्रभाशंकर, नाशिकहून विजय लाड, किष्किंधा कर्नाटकहून संजय जाधव.
कंटेंट सोर्स : वाल्मिकी रामायण, तुलसीदासांचे रामचरित मानस, उत्तर रामायण, पद्य पुराण, कम्ब रामायण, इंडियन गव्हर्नमेंटच्या सायन्स मिनिस्ट्रीने प्रमाणित केलेल्या 'इन्स्टीट्यूट ऑफ साइंटिफिक रिसर्च ऑन वेदाज' च्या डायरेक्टर डॉ. सरोज बाला, रामायणाच्या तारखांसाठी नासाचे सॉफ्टवेयर 'प्लॅटिनम गोल्ड', रामेश्वरमच्या रामतीर्थमचे महंत के. पणभदास, भरद्वाज आश्रमाचे अधिकारी, तीर्थ पुरोहित समाज संघ श्रृंगवेरपुर धाम प्रयागचे अध्यक्ष, रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास आणि इंटरनॅशनल रामायण रिसर्च सेंटर.
नोट : हा रिपोर्ट रामायण आणि वरील कंटेंट सोर्सवर आधारित आहे.

बातम्या आणखी आहेत...