आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: राधे माँ जवळ 1000 कोटींची संपत्ती, पंजाबातील वकीलाचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधे माँ - Divya Marathi
राधे माँ
मुक्तसर/लुधियाना - होशियारपूर येथील सुखविंदर कौर उर्फ राधे माँ चे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता मलोट येथील एका वकिलाने स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये राधे माँ विरोधात तक्रार दिली आहे. अॅड. चून्नीलाल भारतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की राधे माँ उर्फ सुखविंदर कौर स्वतःला देवीचा अवतार सांगून दरबार भरवते. यातून अंधश्रद्धा पसरवली जात आहे. त्यासोबतच धार्मिक भावनांसोबतही खेळ करत आहे.
तक्रारदार वकिलांनी म्हटले आहे, की राधे माँ माता की चौकी नावाने भरवल्या जाणाऱ्या दरबारात असभ्य डान्स करते. नाचता नाचता ती सर्व सीमा ओलांडते. कोणाच्याही गळ्यात पडते. तिने असे कृत्य करुन 1000 कोटींची संपत्ती गोळा केली आहे. याची चौकशी झाली पाहिजे.
अॅड. भारतींनी राधे माँ स्वतःला देवीचा अवतार सांगितल्याने धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असा आरोप केला. धर्माच्या नावाने जनतेची दिशाभूल करुन समाजात अंधश्रद्धा पसरवली जात आहे. त्या माध्यमातून कोट्यवधींची माया गोळा केल्याचा आरोप केला. मलोट पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार गुरमेल सिंग म्हणाले, या तक्रारीची माहिती वरिष्ठांना दिली जाईल. वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कारवाई केली जाईल.
मुळची पंजाबातील राधे माँ सध्या मुंबईतील बोरिवली येथे राहाते. तिथे तिच्याविरुद्ध कौटुंबिक छळाची तक्रार दाखल झाल्यानंतर राधे माँ चर्चेत आली आहे. राधे माँ चर्चेत आल्यानंतर तिच्या संबंधीचे वादग्रस्त प्रकरणे समोर येत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो...