आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढाका हल्ल्याचा मास्टरमाइंड बसला भारतात दडून ? 40 लोक मारले गेले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुलशन बेकरी येथे 1 जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जण मारले गेले होते. - Divya Marathi
गुलशन बेकरी येथे 1 जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जण मारले गेले होते.
कोलकाता - ढाका येथील गुलशन बेकरी येथे 1 जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सात महिन्यांपूर्वी भारतात आला होता. बांगलादेशचा दावा आहे की यावेळीही तो बांगलमध्येच कुठेतरी लपून बसला असणार. ढाकाच्या डिप्लोमॅटिक एरियात झालेल्या हल्ल्यात 40 विदेशी नागरिक मृत्यूमुखी पडले होते.

काय आहे मास्टरमाइंडचे नाव
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार गौहर रिझवी यांनी त्यांच्या देशातून पळून गेलेल्या संशयितांची यादी भारताला सोपवल्याचे म्हटले आहे.
- ढाका हल्ल्याचा मास्टरमाइंड मोहम्मद सुलेमान असल्याचे सांगितले जाते. त्याचा बंगालमध्ये शोध घेतला जात आहे. सुलेमान जमातुल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) संघटनेशी संबंधीत आहे.
- 10 दिवसांपूर्वी वर्धमान सीआयडीने आयएसआयएस ऑपरेटिव्ही अबु अल मूसा अल-बंगाली उर्फ मूसा याला अटक केल्यानंतर सुलेमानचे नाव समोर आले होते.
- मूसाने सांगितले की सुलेमान गेल्या दोन वर्षांपासून त्याचा हँडलर होता.

काय म्हणाले रिझवी
- पत्रकार परिषदेत रिझवींनी सांगितले, 'सरकार देशातून बेपत्ता युवकांची यादी तयार करत आहे. ही यादी भारतालाही सोपविली जाईल. तिथेही त्यांचा शोध घेण्यासाठी याची मदत होईल.'
- ढाका हल्ल्यातील 3 दहशतवादी चांगल्या घरातील असल्याचेही समोर आले होते.
- हे सर्वजण सहा महिन्यांपासून बेपत्ता होते.
- तपासात असाही खुलासा झाला की ढाकामधून 100 हून अधिक युवक बेपत्ता आहेत. यातील बहुतेक 20 वर्षांच्या आसपासचे आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा ढाका हल्ल्याचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...