आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाईपचा आधार घेऊन बिबट्याने वाचवले स्‍वत:चे प्राण, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातमधील पीपलकुवा गावातील एका विहिरीत रात्रीच्‍या अंधारात बिबट्या पडला. पाईपचा आधार घेऊन स्‍वत:चे प्राण वाचवण्‍यासाठी सकाळपर्यंत डरकाळी फोडत होता. ग्रामस्‍थांनी वनविभागाच्‍या कर्मचा-यांना बोलावल्‍यांनतर बिबट्या सुखरूप बाहेर काढण्‍यात आला.
पीपलकुवा गावातील ग्रामस्‍थांनी सकाळी बिबट्याचा आवाज ऐकला. विहिरीतून आवाज येत असल्‍यामुळे ग्रामस्‍थांनी वनविभागाच्‍या अधिका-यांना पाचारण केले. या गावात बिबट्या असल्‍याची चर्चा खूप दिवसापासून होत होती. वनविभागाने गावाच्‍या काही भागामध्‍ये बिबट्याला पकडण्‍यासाठी पिजंरे लावले. मात्र बिबट्याला पकडे शक्‍य झाले नव्‍हते. रविवारी रात्री गावातील प्राण्‍यावर हल्ला करण्‍यासाठी रात्रीच्‍या अंधारात बिबट्या गावाच्‍या दिशेने कुच करत असताना विहिरीत पडला. या विहिरीत मोटरचा पाईप होतो. याचा आधार घेऊन बिबट्याने स्‍वत:चे प्राण वाचवले. व‍नविगाच्‍या कर्मचा-यांनी बिबट्या बाहेर काढून जंगलात सोडून दिले.
बिबट्या बाहेर काढण्‍याचे रेस्‍की ऑपरेशन पाहा फोटो पुढील स्‍लाईडवर...