आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reservation To Be In Judiciary, Chhgan Bhujbal Demand

न्यायपालिकेतही आरक्षण असावे, छगन भुजबळ यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - न्यायपालिकेमध्येही आरक्षण असावे अशी मागणी महाराष्‍ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्‍ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली आहे. शहीद जगदेव प्रसाद जयंती समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, देशाची 54 टक्के लोकसंख्या मागासवर्गीय आहे. यामध्ये 11 टक्के कुशवाह आहेत.
लोकसंख्येचा विचार केल्यास राजकारण आणि अन्य क्षेत्रांत आपला योग्य वाटा नाही. कोणी विकास, कोणी धर्मावर, तर कोणी कर्माच्या आधारावर मते मागत आहे. मत मिळाल्यानंतर आपल्याला कोणी विचारत नाही. आम्ही आता कुणाच्या सांगण्यावरून नव्हे, तर महात्मा फुले आणि जगदेव प्रसाद यांच्या वैचारिक सिद्धांतावर चालणा-यांना मत देऊ, असे भुजबळ म्हणाले.