आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेंगळुरूच्या रस्त्यांवर साचला विषारी फोम, उग्र वासाने साथीच्या रोग पसरण्याची भिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू - येथील बेलंदुर तलावातून निघणाऱ्या विषारी फोममुळे शहरातील मुख्य रस्ता पूर्णपणे झाकला गेला आहे. त्यामुळे, जवळपासच्या परिसरात उग्र दुर्गंध आणि प्रदूषण पसरला आहे. रस्त्यावर साचलेल्या आणि चक्क वाहनचालकांवर उडणाऱ्या या फोममुळे घातक रोगराईची भिती व्यक्त केली जात आहे. गेल्या 10 वर्षांत बेलंदुर तलाव पूर्णपणे विषारी झाला आहे. अशात पावसामुळे पाण्याची पातळी वाढताच हा फेस रस्त्यांवर वाहत आहे. 
 
 
मुख्यमंत्री सिद्धारमय्या चिंतीत...
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या तलावाच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनी तीव्र दुर्गंध आणि प्रदूषणाची तक्रार वेळोवेळी केली आहे. विषारी फोममुळे परिसरात रोगराई पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. 
- दरम्यान, या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी गुरुवारी आपली प्रतिक्रिया दिली. येत्या 1 ते 2 वर्षांत बेलंदुर तलावाची समस्या दूर केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. 
- स्थानिक नागरिक जितेश यांनी सांगितल्याप्रमाणे, "तलावातून फेस निघण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहेत. 2 दिवस झालेल्या पावसामुळे तलाव भरले आणि त्यातील पाणी आणि विषारी फोम रस्त्यावर साचत आहे. यामुळे, लोकांना पायी चालणे किंवा वाहन चालवण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे."
बातम्या आणखी आहेत...