सध्या हा नियम केवळ सहा महानगरांमध्ये लागू करण्यात येणार आहे. त्याशिवाय एखाद्या बँकेची इच्छा असल्यास ती बँक इतर बँकांच्या एटीएमवर
आपल्या खातेधारकांना तीन पेक्षा अधिक मोफत व्यवहारांची सुविधा देऊ शकते. यापूर्वी दुस-या बँकेच्या एटीएममधून पाच वेळा आणि आपल्या बँकेच्या एटीएममधून कितीही वेळा व्यवहार करता येत होते.
6 महानगरांमध्ये आजपासून नियम लागू
आरबीआयने या संदर्भात ऑगस्ट महिन्यामध्येच दिशा-निर्देश जारी केले होते. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. ज्या सहा महानगरांमध्ये हे नवे नियम लागू होतील त्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे.
आरबीआयचे मत
रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले होते की, एटीएमची भरपूर उपलब्धता आणि बँक शाखांसह ग्राहकांकडे व्यवहार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार करून हा निर्णय घेतला जात आहे. त्यात आर्थिक आणि इतर अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांचा समावेश आहे.