आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Retired Army Doctor Killed And Chopped His Wife Into Peaces

आर्मीतील सेवानिवृत्त डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मृतदेहाचे शेकडो तुकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर- लष्करातील एका 71 वर्षीय सेवानिवृत्त डॉक्टरने त्याच्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरने त्याच्या पत्नीची हत्या 15 दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या मृत शरीराचे शेकडो तुकडे करून एका विशिष्ट केमिकलमध्ये टाकून ठेवले होते. डॉ. सोमनाथ पारिदा असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी नयापल्ली येथून अटक केली.

पोलिस उपायुक्त (डीसीपी) नितिनजीत सिंग यांनी सां‍गितले की, आरोपी सोमनाथ पारिदा याने गुन्हा कबूल केला आहे. परंतु पारिदा याने त्याची पत्नीची निर्घृण हत्या का केली असावी हा पोलिसांना मोठी प्रश्न आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे.

डीसीपी सिंग यांनी सांगितले की, सोमनाथची पत्नी उसाश्रीच्या शरीराचे तुकडे घरातील एक डब्यात आढळून आले. ते पूर्णपणे सडलेले होते. मोठी दुर्गंधीही येत होती. अशा परिस्थितीतही आरोपी घरात राहत होता.

आरोपीचा एक नातेवाईक त्याच्या घरी आल्यानंतर या हत्येचा भांडाफोड झाला. दरम्यान अमेरिकेत असल्या आरोपीच्या मुलाने अनेकदा फोन केला होता. परंतु फोन कोणीच उचलत नव्हते. त्यामुळे आरोपीच्या मुलाच्या सांगण्यावरून हा नातेवाईक त्याच्या घरी आला होता.

नातेवाईकाला पाहून पारिदा घाबरला होता. त्याने त्याच्या पत्नीबाबतही उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा त्याचे लक्ष एक डब्याकडे गेले त्यात डॉक्टरच्या पत्नीच्या शरीराचे तुकडे होते. त्याने तत्काळ पोलिसांना सूचना दिली.