आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Retired Army Officer Shot Dead Muzaffarnagar Latest News

उत्तरप्रदेशात आणखी एका भाजप नेत्याची हत्या, चोरट्यांनी रिव्हॉल्वरही नेले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ/मुजफ्फरनगर - उत्तरप्रदेशमध्ये आणखी एका भाजप नेत्याची हत्या करण्यात आली आहे. मुजफ्फरनगर जिल्ह्याच्या मीरापूरचे शहर उपाध्यक्ष ओमवीर यांची मंगळवारी अज्ञात चोरट्यांनी गोळ्या घालून हत्या केली. याआधी युपीच्याच दादरी भागामध्ये भाजप नेते विजय पंडित यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मिकांत वाजपेयी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना फोनवर माहिती देण्यात आली आहे. लक्ष्मिकांत वाजपेयी हे बुधवारी मीरापूरला भेट देण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे.
निवृत्त लष्करी अधिकारी होते ओमवीर
मुजफ्फरनगरच्या मीरापूर ठाणे क्षेत्रातील नंगला या गावातील ही घटना आहे. भाजपचे शहर उपाध्यक्ष ओमवीर हे निवृत्त लष्करी अधिकारी होते. मंगळवारी सकाळी ते नंगला गावाहून मीरापूरला येत होते. त्यावेळी नहर पटरीवर दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात ओमवीर यांनीही त्यांच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या. त्यामुळे एक हल्लेखोर जखमीही झाला. त्यानंतर समोरासमोर झालेल्या गोळीबारानंतर भाजप नेत्यांचा मृत्यू झाला. ओमवीर यांचा मृत्यू झाल्यानंतर हल्लेखोर आपल्या जखमी साथीदाराला घेऊन फरार झाले.

रिव्हॉल्वरही पळवले
हल्लोखोर मृत नेत्यांची परवाना असलेली रिव्हॉल्वरही पळवून घेऊन गेले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिस गुन्हेगारांना पकडण्यासाठी संशयितांवर नजर ठेऊन आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. ओमवीर 2007 मध्ये लष्करातून निवृत्त झाले होते. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येमागे जुन्या वैराचे कारण अशण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकांचा संताप
घटनेबाबत माहिती मिळतात रागावलेल्या गावक-यांनी मेरठ-पौडी मार्गावरील मोंटी चौकात निदर्शने केली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी केली होती. लोकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचा विश्वास दर्शवला आहे.

युपी सरकारला इशारा
मुजफ्फरनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष सतपाल सिंह यांनी युपी सरकार आणि जिल्हा प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली आहे. या दोन दिवसांत आरोपींना अटक केली नाही, तर राज्यभरात भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. अशा घटना म्हणजे लोकशाहिला काळीमा फासणा-या असल्याचे ते म्हणाले.

नोयडातही झाली होती भाजप नेत्याची हत्या
याआधी शनिवारी चार अज्ञात हल्लेखोरांनी नोयडामध्ये भाजप नेते विजय पंडित यांची गोळ्या घालून हत्या केली होती. बाईकवरून आलेल्या या हल्लेखोरांनी पंडित यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर लोकांनी चांगलाच गोंधळ घातला होता. या प्रकरणी अध्यापही पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही.
पुढे पाहा..घटनेशी संबंधित काही फोटो