आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revenge Take For Mehdi Arresting, Isis Give Threat On Twitter

प्रश्‍न अंतर्गत सुरक्षेचा: मेहदीच्या अटकेचा बदला घेऊ; इसिसची टि्वटरवर धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - इराक व सिरियाच्या काही भागांवर ताबा मिळवून इस्लामिक स्टेट स्थापन करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या आयएस या दहशतवादी संघटनेने आता भारतालाही धमकी दिली आहे. बंगळुरूमधून या संघटनेचे ट्विटर अकाऊंट ऑपरेट होत असल्याचे ब्रिटिश माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी मेंहदी या युवकास अटक केली आहे. या अटकेनंतर आयएसने या अटकेचा बदला घेऊ, अशी धमकी ट्विटरवरूनच दिली आहे.

‘आमच्या भावाला तुमच्या हाती पडू देणार नाही. आम्ही बदला घेऊ. वाट पहा,’ अशा शब्दांत ही धमकी देण्यात आली आहे. आयएसचे अकाऊंट चालवणा-या मेंहदी मसरुरू याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक गोयल यांनी टि्वटरवर ही माहिती दिली. यांनतर काही वेळातच धमकी देणारे टि्वट करण्यात आले. टि्वटरवरील ‘@abouanfal6’ या हॅण्डलद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हा इशारा देण्यात आला आहे.

पोलिस अधिका-यांनाही धमक्या : मेंहदीला अटक करण्याच्या मोहिमेत सहभागी असलेल्या काही पोलिस अधिका-यांनाही धमकी देणारे ई-मेल मिळाले असून हे मेल नेमके कुठून आले आहेत, याचा तपास सुरू आहे. हे मेल भारतातूनच पाठवण्यात आले आहेत का, याची माहिती घेतली जात असून या माध्यमातून आयएसचा पर्दाफाश होऊ शकेल.