आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्द को भी दर्द होता है, "प्रेमाला ताकद समजणे हाच खरा पुरुषार्थ'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ शोच्या तिस-या सत्राचा शेवटचा एपिसोड पुरुषार्थ व त्याच्याशी संबंधित हिंसेवर आधारित होता. भावनांवर आवर घालणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे. मर्दही रडतो, त्यालाही वेदना होतात, हा निष्कर्ष यातून निघाला.

मर्द कोण? मदतनीस, बलवान, समजदार, रक्षक, चांगली विचारधारा असलेला, प्रामाणिक व ज्याला यातना होत नाही तो मर्द असे पुरुषांचे म्हणणे आहे. मात्र, महिलांचे मत याउलट आहे. नियंत्रण ठेवणारा, अहंकारी व रागीट असतो तो मर्द, असे त्यांचे मत आहे. मात्र, पुरुष व महिलांची ही कॉकटेल भावना घातक असल्याचे मत आमिरने या शोमध्ये व्यक्त केले. या वेळी अनेक लोकांनी त्यांचे मत विशद केले. एका किरकोळ रस्ता अपघातातून घडलेल्या घटनेत मुलगा आकाश लोकांच्या रागाचा शिकार झाला, असे दिल्लीचे महेंद्र सिंह यांनी सांगितले. तर रँगिंगमुळे आपला मुलगा अमितचे प्राण गेले. रँगिंग घेणा-यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली मात्र अर्ध्या तासातच त्यांना जामीन मिळाला, असे लष्करात कार्यरत त्रिवेणी सहाय यांनी सांगितले. ९४ टक्के गुन्ह्यांमध्ये पुरुष सामील असतात असे आमिरने या वेळी सांगितले. परंतु पुरुष जन्मजातच हिंसक असतो का? यावर वेगवेगळ्या राज्यातून आलेले विपिन भाटी, लेनिन रघुवंशी, छिंद्रपाल, राम मेहर आणि मदन भारतीय यांनी उत्तर दिले.

पुरुषांना अपमान सहन होत नाही. मुलीने लग्नाला नकार दिल्यास तिच्यावर अॅसिड हल्ला होतो. लक्ष्मीसोबतही हेच घडले. ती सांगते की, आत्मसन्मानाला ठेच पोहोचल्याने किंवा मागणी पूर्ण न झाल्यास पुरुष हिंसक बनतात. अॅसिड हल्ला, बलात्कार व हुंड्यांसाठी हत्या करणा-यांचे नंतर सहज लग्न होते, हे दुर्दैव असल्याचे लक्ष्मी सांगते.

पुरुषार्थाचा नैसर्गिकतेशी काहीच संबंध नाही
महिला अधिकार कार्यकर्त्या कमला भसीन यांच्या मते, ताकदीला प्रेम करणे नव्हे, तर प्रेमालाच ताकद समजणे म्हणजे पुरुषार्थ होय. याचा नैसर्गिकतेशी काहीच संबंध नसतो. गर्भाशय आणि बाळाचे स्तनपान सोडले, तर महिला आणि पुरुषात फरकच काय? असा प्रश्न करत त्या सांगतात की, पुरुषही प्रेमळ, ममतामयी असतात. बुद्धांनी ते सिद्ध केले आहे. फक्त पुरुषार्थामुळेच पुरुषांना जास्त नुकसान होतो.

चित्रपट महिलांना वस्तूच्या रूपात दाखवतात
या कार्यक्रमात अभिनेत्री दीपिका पादुकोन, कंगना राणावत, परिणीती चोप्रासुद्धा आल्या होत्या. चित्रपटांमध्ये महिलांना कशाप्रकारे वस्तू म्हणून दाखवले जाते, हे एका शॉर्टफिल्ममधून दाखवण्यात आले. मात्र, चित्रपटांत दाखवले जाते ती वास्तविकता नसल्याचे तिघींनीही या वेळी सांगितले. मी खूप भावुक आहे. मात्र, सध्या मुलांना भावना व्यक्त करण्यास सांगावे लागते, असे अमिताभ बच्चन यांनी या वेळी सांगितले.