आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांसह चौकशीस जातात तेव्हा पाठीमागे ‘ऑडी’त असतात नोकर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनुमानगड (राजस्थान) - ही कहाणी आहे उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या चार सख्ख्या भावांची. ज्यांच्या डोक्यात एकच गोष्ट स्वार होती, सर्वाधिक श्रीमंत होणे. यासाठी त्यांनी आपला ज्वेलरीचा पूर्वजांपासून चालत आलेला व्यवसाय सोडून दिला. एक गॅस कंपनी उघडली. देशभरातील १२ राज्यांत वितरक नेमण्याच्या नावावर त्यांनी कोट्यवधी रुपयांना लोकांना फसवले आणि आता पकडले गेले तेव्हाही त्यांचा थाटमाट सुरूच आहे. आता त्यांना पोलिस कोठेही घेऊन जातात तेव्हा त्यांच्या मागोमाग त्यांचे नोकर लक्झरी गाड्यांमधून येत असतात.  
 
विशेष गोष्ट ही आहे की, यांच्या थाटाची सध्यातरी कोणालाच माहिती नाहीये. हा खुलासा तेव्हाच झाला जेव्हा अशातच त्यांना राजस्थानच्या अलवरहून हनुमानगडला आणले गेले. येथे त्यांच्या चौकशी अधिकाऱ्यांशी ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी बोलले. त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी ते श्रीमंत झाले खरे, पण यानंतर त्यांचे थाट असे झाले की आता चारही  भावांना ज्या राज्याचे पोलिस अटक करून घेऊन जातात, तेव्हा एक ऑडी व दोन इनोव्हा गाड्यांत यांच्या नोकरांची टीमच यांच्यासह जाते. या गाड्यांमध्ये त्यांच्या खाण्यापिण्याची प्रत्येक वस्तू उपलब्ध आहे.  
 
रेशन व जेवण बनवण्याचे सर्व साहित्य यात ठेवलेले असते. आरोपींचा प्रयत्न हाच असतो की, अटकेच्या दरम्यान रस्त्यात अथवा ठाण्यात यांना बाहेरचे खाणे खावे लागू नये. या घोटाळ्याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा त्यांनी २०११ मध्ये गॅस कंपनी बनवली होती. त्यांनी राज्यात पहिले गॅस डीलर वितरक बनविण्याच्या नावावर लोकांकडून १० -१० लाख रुपये घेतले. विश्वास निर्माण करण्यासाठी एक वर्ष गॅस पुरवठाही केला. पुन्हा गॅस पुरवठा आणि सिलिंडरच्या अनामत-सुरक्षा रकमेच्या स्वरूपात ६० ते ७० लाख रुपये अधिकचे घेतले. सर्व जागी ६६८ वितरक बनवून २५०० कोटी रुपये गोळा केले. मग अचानक काम बंद केले. 

देशभरातून २५०० कोटींहून अधिकची फसवणूक केल्याप्रकरणी खटले दाखल झाल्यानंतर आता चौघेही भाऊ देशभरातील तुरुंगांची हवा खात आहेत. प्रथम राजस्थानच्या जयपूर आणि अलवर पोलिसांनी अटक केली. आता या आठवड्यात हनुमानगड पोलिसांनी अटक करून आणले आहे. पोलिस अधिकारी सांगतात की, लखनऊच्या इंदिरानगरचे दिलीप कुमार, विजय कुमार, पवन कुमार व राकेश कुमार यांचा ज्वेलरीचा व्यवसाय होता. चौघांचे काम फारच सामान्य होते; पण लालसा एकच होती- ते सर्वाधिक श्रीमंत व्हावेत. यासाठी त्यांनी ज्वेलरीचा व्यवसायच बंद केला.  
चौघा भावांनी २०११ मध्ये कंपनी रजिस्टर्ड केली. ठरविले की ते एक गॅस कंपनी उघडतील, पण यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज होती. यासाठी मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील बानमौर स्थित प्राची गॅसचा बॉटलिंग प्लँट भाड्याने घेतला. यासह त्यांनी देशभरात डीलरशिप (वितरक) देणे सुरू केले.   
 
 
बातम्या आणखी आहेत...