आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थीनीने बॉडीगार्डला समजले अमेरिकचा राजदूत, केले औक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर - अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड राहुल वर्मा यांनी गुरुवारी जालंधरच्या एका शाळेला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी आरतीचे ताट हातात घेऊन एक विद्यार्थीनी उभी होती. रिचर्ड यांच्यासमोर त्यांचे अंगरक्षक चालत होते. विद्यार्थीनीने त्यालाच रिचर्ड समजून औक्षण सुरु केले, तेव्हा अंगरक्षकाने रिचर्ड मी नसून मागे आहे, असे विद्यार्थीनीला खुणावले. चूक लक्षात आल्यानंतर विद्यार्थीनी रिचर्ड यांच्याजवळ जाऊन त्यांचे औक्षण केले. या सर्व प्रकाराने सभागृहात खसखस पिकली होती.
रिचर्ड जालंधरच्या डीएव्ही कॉलेजच्या एका कार्यक्रमातही सहभागी झाले. यावेळी ते म्हणाले, 64 वर्षांपूर्वी याच कॉलेजमधून माझ्या वडीलांनी पदवी शिक्षण पूर्ण केले होते. ते आम्हाला नेहमी सांगत, जिथे कुठे तुम्हाला भारतीय भेटतील त्यांना सांगा, 'वी आर फ्रॉम सेम प्लेस'. यामुळे तुम्ही एकमेकांशी जोडले जाल. रिचर्ड 2009 मध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन यांचे सल्लागार होते. तेव्हा भारताचे तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना भेटण्याची संधी त्यांना मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधानांची ओळख करुन दिली होती. जेव्हा त्यांना कळाले की मी जालंधरचा आहे, तेव्हा ते ओबामांना म्हणाले, - सी... रिचर्ड अँड मी आर फ्रॉम सेम प्लेस. तेव्हा मी खूप हसलो होतो.
भारताच्या मेक इन इंडिया कँपेनप्रमाणे अमेरिकन अॅम्बेसीने सिलेक्ट यूएस प्रोग्राम तयार केला आहे. या योजेनंतर्गत नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित केले जाणार आहे. राजदूत रिचर्ड वर्मा यांनी या योजनेच्या अनुषंगाने काही उद्योजकांची भेट घेतली. त्यांनी भारतीय उद्योजकांना अमेरिकेत गुंतवणीकीचे असलेले पर्याय आणि दिल्या जाणाऱ्या सुविधा व व्हिसा नियमांबद्दल माहिती दिली.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रिचर्ड यांच्या जालंधर भेटीची छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...