आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायावतींपेक्षा रिक्षाचालक बरा, दयाशंकर सिंह यांची टिप्पणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलिया - बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळे भाजपमधून निलंबित झालेले नेते दयाशंकर सिंह यांनी पुन्हा मायावतींविरोधात आघाडी उघडली आहे. मायावती यांच्यापेक्षा रिक्षाचालक बरा, अशी टिप्पणी दयाशंकर यांनी केली आहे.

दयाशंकर सिंह यांच्या पत्नी स्वाती यांनी बुधवारी रात्री एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात दयाशंकर म्हणाले की, ‘मायावतींपेक्षा रिक्षाचालक बरा आहे. एकदा त्याने एखाद्या प्रवाशासोबत भाडे ठरवले की मग तो दुसऱ्या प्रवाशाशी व्यवाहर करत नाही. मायावतींचे मात्र तसे नाही. त्या पैशासाठी काहीही करू शकतात.’ याआधीही दयाशंकर यांनी मायावती यांच्यावर तिकिटे विकत असल्याचा आरोप केला होता. या कार्यक्रमात स्वाती सिंह यांनी राज्यातील सपा सरकारवर टीका केली.
बातम्या आणखी आहेत...