आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिलेशकडून रिक्षावाल्यास घसघशीत दिवाळी भेट;

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- ऐनदिवाळी सणात लखनऊमधील एका सायकल रिक्षावाल्याचे नशीब फळफळले. वाहतुकीच्या कोंडीत सापडलेल्या पेटीएमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या बंगल्यात सोडले. तेव्हा त्या रिक्षावाल्याने त्यांच्याकडे रिक्षाच्या भाड्यापोटी ५० रुपये मागितले, पण त्यांच्या स्वागतास आलेल्या मुख्यमंत्र्यांनी रिक्षावाल्यास 5 हजार रुपये रोख एक ई- रिक्षा आणि त्याला राहण्यासाठी घर भेट दिले.

अखिलेश यादव यांनीच ही माहिती टि्वटरवर दिली. यश भारतीच्या अवॉर्डाने त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. त्यानिमित्ताने ते अखिलेश यादवांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले होते, परंतु वाटेत वाहतूक कोंडीत त्यांची कार अडकली. आपणास मुख्यमंत्र्यांकडे जाण्यास उशीर होऊ नये म्हणून ते रिक्षातून बंगल्यावर गेले. आपल्या रिक्षात बसलेल्या व्यक्तीकडे हजार कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता आहे, याची त्या गरीब रिक्षावाल्यास काय कल्पना असणार? मणिराम मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातून बाहेर पडत होता, परंतु विजय यांनी त्याला बंगल्याच्या आता सोडण्यास सांगितले. आधी सुरक्षारक्षकांनी त्याला मज्जाव केला. तो रिक्षावाला परत चालला होता, पण अखिलेश यांनी त्याला थांबवले.
दिवाळी भेट म्हणून हजार रुपये रोख, एक ई-रिक्षा आणि लखनऊमध्ये राहण्यासाठी त्याला घर दिले.
बातम्या आणखी आहेत...