आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रिक्षावाल्याने IAS बनवले मुलाला, IPS सुनेने दिली ही प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून IAS गोविंद, त्यांची पत्नी IPS चंदना आणि नारायण जायसवाल. - Divya Marathi
डावीकडून IAS गोविंद, त्यांची पत्नी IPS चंदना आणि नारायण जायसवाल.
वाराणसी - श्रीरामचंद्रांनी लंकेवर विजय मिळवल्यावर दिवाळी साजरी झाली होती. या विजयात केवट, शबरी आणि वानर सेनेसारख्या असंख्य श्रमिकांचे- कामकऱ्यांचेही मोठे योगदान होते. दिवाळीच्या निमित्ताने DivyaMarathi.com अशीच एका श्रमिकाची इन्स्पायरिंग स्टोरी सांगत आहे. ज्यांनी जिद्दीने यश मिळवले आणि समाजासमोर मोठा आदर्श उभा केला.
- काशीत रिक्षा चालवणारे नारायण जायसवाल यांनी दीर्घ मेहनतीनंतर आपल्या मुलाला IAS बनवले होते. एवढेच नाही, त्यांच्या मुलाचे लग्न एका IPS अधिकाऱ्यांशी झाले होते. मुलगा-सून दोघेही गोव्यात पोस्टेड आहेत.
 
शिळे अन्न खाऊन काढले दिवस...
- नारायण म्हणाले, मला 3 मुली (निर्मला, ममता, गीता) आणि एक मुलगा आहे. अलईपुरामध्ये आम्ही किरायाच्या घरात राहत होतो. माझ्याकडे 35 रिक्षा होत्या. त्या मी किरायाने चालवत होतो. सगळे काही ठीक होते. यादरम्यान पत्नी इंदूला ब्रेन हॅमरेज झाले, तिच्या इलाजात जवळचे सगळे पैसे खर्च झाले. 20 हून जास्त रिक्षा विकाव्या लागल्या, परंतु तिचे निधन झाले. तेव्हा गोविंद 7वीत होता.
- गरिबी एवढी होती की, माझ्या कुटुंबाला दोन्ही वेळा शिळे अन्न खाऊन दिवस काढावे लागत होते. मी स्वत: गोविंदला रिक्षावर बसवून शाळेत नेत होतो. आम्हाला पाहन शाळेतील मुले माझ्या मुलाला टोमणे मारत होते- आला पाहा रिक्षावाल्याचा मुलगा. मी जेव्हा लोकांना सांगायचो की, मी माझ्या मुलाला IAS बनवणार आहे, तेव्हा सर्व जण माझ्यावर हसायचे.
- मुलींचे लग्न करण्यासाठी उरलेल्या सर्व रिक्षाही मला विकाव्या लागल्या. फक्त एक रिक्षा राहिली, ती चालवून मी घरखर्च भागवत होतो. पैसे नसल्याने गोविंद सेकंड हँड पुस्तके घ्यावी लागायची.
 
असा बनला IAS
- गोविंद जायसवाल 2007 बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते सध्या गोव्यात सेक्रेटरी फोर्ट, सेक्रेटरी स्किल डेव्हलपमेंट आणि इंटेलिजन्सचे डायरेक्टर अशा 3 पदांवर कार्यरत आहेत.
- ते हरिश्चंद्र युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्यूएट झाल्यानंतर 2006 मध्ये सिव्हिल सर्व्हिसच्या तयारीसाठी दिल्लीला गेले होते. तेथे त्यांनी पार्टटाइम जॉब्स करून आपला ट्यूशन खर्च काढला. त्यांची मेहनत फळाला आली आणि पहिल्याच प्रयत्नात ते 48वी रॅंक मिळवून IAS बनले.
- गोविंद यांची मोठी बहीण ममता म्हणाल्या- लहानपणापासून भाऊ अभ्यासात हुशार होता. आईच्या निधनानंतरही त्याने अभ्यासात खंड पडू दिला नाही. तो दिल्लीला गेल्यानंतर वडील मोठ्या मुश्किलीने त्याला पैसे पाठवायचे. घरची परिस्थिती पाहून भावाने चहा आणि एक वेळचे जेवणही बंद केले होते.
 
भावजीने शोधली IPS सून
- ममता म्हणाल्या- 2011 मध्ये नागालँडमध्ये पोस्टेड होता. माझे पती राजेश यांना त्यांच्या वकील मित्राशी बोलताना चंदनाबाबत कळले. ती त्या वकिलाची भाची होती आणि त्याच वर्षी IPS म्हणून सिलेक्ट झाली होती. तिची कास्ट दुसरी होती, परंतु आमच्या कुटुंबाने हे स्थळ पसंत केले. लोकांना वाटते की लव्ह मॅरेज होते, परंतु हे खरेतर अरेंज्ड मॅरेज होते.
 
रिक्षा चालवणाऱ्या सासऱ्याबद्दल IPS सुनेची प्रतिक्रिया
- चंदना म्हणाल्या, मला अभिमान आहे की, असे सासरे मिळाले ज्यांनी समाजासमोर आदर्श ठेवलाय. गरिबी-श्रीमंतीचा बाऊ करणाऱ्यांना त्यांनी त्यांच्या कार्यातून उत्तर दिले आहे.
 
मित्राच्या घरी झाला होता अपमान
- IAS गोविंद म्हणाले- लहानपणी एकदा मित्राच्या घरी खेळायला गेलो होतो, तेव्हा त्याच्या वडिलांनी मला घरात बसलेला पाहून अपमान करून घराबाहेर काढले आणि म्हटले की, पुन्हा घरात शिरण्याची हिंमत करू नकोस. मी रिक्षाचालकाचा मुलगा आहे म्हणून त्यांनी असे केले होते.
- त्या दिवसापासून सर्व मित्रांच्या घरी जाणे बंद केले. त्या वेळी माझे वय 13 वर्षे होते. पण त्याच दिवशी निश्चय केला होता की, मी IAS बनणारच, कारण हेच सर्वात मोठे पद असते.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, IAS गोविंद यांच्या फॅमिलीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...