आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटलेल्या ईव्हीएमवर नकाराधिकाराचे ट्रेनिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बस्तर- छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून ग्रामस्थांना ते उमेदवार नाकारण्याचा अधिकार (राइट टू रिजेक्ट) कसा वापरायचा हे शिकवत आहेत. त्यासाठी लुटलेल्या इव्हीएमचा वापर केला जात आहे.

मशीनला राइट टू रिजेक्टचे डमी बटण बसवण्यात आले आहे. त्याच मशीन नक्षलवादी गावागावांत घेऊन जात आहेत. नकाराधिकार समजावून सांगत आहेत. बिजापूर आणि दंतेवाडा जिल्हय़ांतील 10 ते 12 गावांत प्रवास केला तेव्हा हा प्रकार समोर आला. या गावांतील लोकांना उमेदवार कोण आहेत हेदेखील माहिती नाही. त्याच गावांत नक्षलवाद्यांनी बहिष्काराची पद्धत बदलली आहे. येथील अनेक मतदारसंघांत अद्याप कोणीही उमेदवार पोहोचू शकलेला नाही.