आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: झारखंडमधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला फरशीवर जेवण वाढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- झारखंडमधील सर्वात मोठे सरकारी हॉस्पिटल 'रिम्स' मध्ये एका महिला रुग्णासोबत जनावराप्रमाणे व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्थो वार्डच्या कॉरिडोरमध्ये बुधवारी एका महिलेेला हॉस्पिटलच्या किचन स्टाफने फरशीवर जेवण वाढले. पलमती देवी असेे महिलेचे नाव आहे.

300 कोटींंच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांंची अशी दैना...
- 'रिम्स'च्या आर्था वार्डाबाहेरील व्हरांंड्यात महिलेला ठेवण्यात आले आहे. ती बेवारस आहे.
- महिलाला अॅडमिट केले पण तिला बेड दिला नाही. तिला व्हरांड्यात ठेवले.
-महिलेेने किचन स्टाफला जेवण मागितले. सुरुवातीला स्टाफने महिलेला फटकारले. नंंतर तिला फरशी साफ करायला सांंगून फरशीवरच डाळ-भात, भाजी वाढण्यात आले.
- दरम्यान, महिला बेवारस असून तिच्याकडे रुपये नाही. ती विकत जेवण घेऊ शकत नाही.
- त्यामुळेे महिला रुग्णांंची मजबूरी की, रिम्सची लाचारी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- 300 कोटी रुपये खर्च करून सरकारने हे हॉस्पिटल सुरु केले आहे. पण रुग्णांंना जेवण देण्यासाठी देखील हॉस्पिटल प्रशासनााकडे भांंडे नाहीत.

कोट्यवधींंच्या मशिनी भंंगारात...
- महिला रुग्णाला फरशीवर जेवण दिल्याने रिम्स प्रशासनाचा ढिम्मपणा चव्हाट्यावर आला आहे.
-हॉस्पिटलमधील कोट्यवधींंच्या मशिनी भंंगारात पडल्या आहेत. रिम्स प्रशासनाचा ढिम्मपणा चव्हाट्यावर आला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सरकारी हॉस्पिटल आणि किचनचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...