आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झारखंड बंदला हिंसक वळण, डीएसपीच्या कानशिलात लगावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: रामगडचे चितरपुरमध्ये आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झालेले पोलिस )
रांची (झारखंड)- कुर्मी विकास मोर्चाने पुकारलेल्या 'झारखंड बंद'ला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली. एवढेच नव्हे तर एका आंदोलकाने जिल्हा पोलिस निरीक्षकाच्या कानशिलात लगावल्यामुळे गोंधळ उडाला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारीत अनेक पोलिस जखमी झाले आहेत.
कुर्मी जातीचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी कुर्मी विकास मोर्चाच्या आंदोलकांनी आज (गुरुवार) 'झारखंड बंदची हाक दिली आहे. आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. रामगड जिल्ह्यातील चितरपुर येथे आंदोलकांशी चर्चा करण्‍यासाठी आलेले जिल्हा पोलिस निरीक्षक (डीएसपी) दीपक कुमार आले होते. आंदोलकांशी चर्चा करणार तितक्यात एक युवक दीपक कुमार यांच्याजवळ आला आणि त्याने त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे आंदोलक अधिकच संतापले. त्यांनी पोलिसांनाच हल्ला चढवला. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यांना मारहाणही केली. त्यांचे कपडे फाडले. यात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. रामगडचे एसपी डॉ.एम तमिलवामण हे या घटनेची चौकशी करत आहेत.

SDO च्या गाडीवरही दगडफेक...
रामगड जिल्ह्यातील चक्रधरपुर तालुक्यातील कराईकेला गावात कुर्मी आंदोलकांनी एसडीओ रवीशंकर शुक्ला यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यात शुक्ला जखमी झाले आहेत. संतप्त आंदोलकांनी पोलिस स्टेशनमध्ये घुसून तोडफोड केली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, PHOTOS:
(फोटो: राजेश गोल्डी/सोहन सिंह)
बातम्या आणखी आहेत...