आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुजफ्फरनगरमध्ये दंगलीनंतर लष्‍कर पाचारण, 26 जण ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरनगर- उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर शहरात शनिवारी दोन समुदायात झालेल्या दंगलीचा वणवा पसरला आहे. मृतांचा आकडा 26 वर गेला असून यामध्ये एका वृत्तवाहिनीच्या पत्रकार आणि कॅमेरामनचाही समावेश आहे. दंगलीत 34 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्‍यासाठी लष्‍कराला पाचारण करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्याला छावणीचे स्‍वरुप प्राप्‍त झाले आहे.

मुजफ्फरनगरमध्ये गेल्या दहा दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण आहे. शनिवारी महापंचायतमध्ये सहभागी होण्यासाठी नंगला मंदौडला निघालेल्या बसवर दुसर्‍या समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली.त्यामुळे चिडलेल्या प्रवाशांनी त्या समुदायातील एका तरुणाला बेदम मारहाण केली.या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.हे वृत्त वार्‍याच्या वेगाने पसरताच परिसरातही दंगल भडकली. यामध्ये आयबीएन सेव्हन या हिंदी वृत्तवाहिनीचा स्ट्रींगर राजेश वर्मासह सहा जण मृत्यूमुखी पडले. दंगलखोरांनी वर्माला गोळ्या घातल्या.

छेडछाडीमुळे सुरुवात
दहा दिवसांपूर्वी शहरातील कवाल भागात एका मुलीची छेड काढण्यात आली होती. त्यावेळी दोन समुदायातील संघर्षात तीन तरुणांचा मृत्यू झाला होता.

दंगलीचे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....