आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमध्ये भूस्खलन; सनकोशी नदीच्या मार्गात मोठा अडथळा, बिहारमध्ये हाय अलर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- नेपाळमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सनकोशी नदीत (बिहारमधील कोशी नदी) भूस्खलन झाले आहे. सिंधुपाल चौक जिल्हयातील सनकोशी नदीत पात्रात मोठा डोंगर कोसळल्याने प्रवाहात मोठा अडथळा ‍निर्माण झाला आहे. नदी पात्रात अडीच किलोमीटर लांबीचा 130 मीटर खोल कृत्रिम तलाव बनला आहे. ढिगारा फुटला तर अवघ्या 14 तासांत बिहारमधील कोशी नदीला महापूर येईल, आणि ब‍िहारमध्ये हाहाकार माजेल, या पार्श्वभूमीवर बिहारमधील आठ जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सनकोशी नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने सुमारे 20 ते 27 लाख क्यूसेक पाणी अडकून पडले आहे. ढिगारा हटवण्यासाठी शनिवारी तीन भूसुरंग लावण्यात आले होते. नंतर पाणी हळूहळू प्रवाहीत होत आहे. परंतु, ढिगारा पूर्ण हटवला गेला तर बिहारमध्ये हाहाकार उडू शकतो. केंद्रीय जल आयोगानुसार, कोशीमध्ये 10 लाख क्यूसेक पाणी सोडले जाणार आहे. मात्र, तयार झालेल्या तलावात सध्या 25 लाख क्यूसेक पाणी आहे. यापाण्यामुळे बिहारमध्ये 2008 सारखी पूरस्थिती निर्माण होऊ शकते, असे नेपाळ सरकारने सांगितले आहे.
बिहारमधील पूर्णिया, सुपौल, मधेपुरा, सहरसा, अररिया, कटिहार, मधुबनी आणि खगडिया या आठ जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्‍यात आला आहे. राज्य सरकाराने केंद्र सरकारला मदतीची मागणी केली आहे. वीरपूरमधील कोसी नदीवरील धरणाचे सर्व 56 दरवाजे उघडण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सच‍िव व्यासजी यांनी सांगितले की, सुपौल जिल्ह्याती 22 गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या गावांमधील जवळपास 50 हजार लोकांवर बेघर होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
दुसरीकडे, नेपाळ सरकारना नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच भारत सरकारकडून मदत मागितली आहे. आपण नेहमी नेपाळ सरकारच्या संपर्कात असल्याचे बिहारमधीलचे जलसंपदा मंत्री विजयकुमार चौधरी यांनी सांगितले आहे.

...तर बिहारमध्ये हाहाकार उडेल?
>नेपाळमधील सनकोशी नदीत भूस्खलन झाल्याने प्रवाहात मोठा अडथडळा निर्माण झाला. पाण्‍याचा प्रवाह थांबल्यामुळे
>2.5 किमी लांबीचा 130 मीटर खोल तलाव बनला आहे.
>तलावाचा बांध फुटल्याने अवघ्या 14 तासांत कोशी नदीत पाणी पोहोचेल.
>वेगात पाणी आल्याने नदीवर बांधलेल्या धरणांचे बांध फूट शकतात.
>महापूराच्या पार्श्वभूमीवर वीरपूर धरणाचे सगळे 56 दरवाजे उघडण्यात आले आहे.

काय उपाययोजना?
>नदी काठावर राहणार्‍या 1.5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे.
>सुपौल आणि मधेपुरा में एनडीआरएफचे तीन-तीन पथक पाठवण्यात आले आहे.
>एसडीआरएफचे चार पथकही तैनात करण्यात आहे. पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
>सहा जिल्ह्यात 76 मदत शिबिरे सुरु करण्‍याचे निर्देश देण्यात आले आहेत.
>बिहार सरकारने बचाव कार्यासाठी लष्काराची मदत मागितली आहे.
>जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आणि अभियंत्यांचे विशेष पथक विमानाने वीरपूर पोहोचले आहे.
>बिहार सरकारने रेल्वे आणि वीज विभागाला हाय अलर्ट जारी केला आहे.

आजूबाजूच्या जिल्ह्यात पाठवले पोलिस पथक...
कोसी नदीमध्ये महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात असताना आजूबाजूच्या जिल्ह्यात राज्य पोलिस पथक पाठवण्यात आले आहे. सुपौल आणि मधेपुरामध्ये अतिरिक्त पोलिस पथक पाठवले असल्याची माहिती एडीजी (मुख्यालय) गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितले.

एनडीआरएफचे 15 पथके बिहारमध्ये पाठवण्याचा निर्णय...
केंद्रीय कॅबिनेट सचिव अजीत शेठ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण समिती बैठक झाली. त्यात नेपाळ आणि आणि ब‍िहारमध्ये एनडीआरएफचे 15 पथके पाठवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असल्याची माहिती शेठ यांनी दिली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा छायाचित्रे...
(फोटो: नेपाळमधील सनकोशी नदीत अडीच किलोमीटर अंतराचा डोंगर कोसळल्याने नदी मार्गात 130 मीटर खोल तलाव बनला आहे.)