आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या गया येथील सभेत हल्ल्याचा धोका; ९ ऑगस्ट रोजी सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गया- येत्या ९ ऑगस्ट रोजी येथील गांधी मैदानावर होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत पोलिसांच्या वेशात काही अतिरेकी हल्ला करण्याची शक्यता गुप्तचरांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

गुप्तचरांना मिळालेल्या माहितीनुसार, मोदींच्या या सभेत हल्ला करण्याचा कट काही दहशतवादी संघटनांनी आखला असून बिहारमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला केला जाण्याची शक्यता गुप्तचर विभागांतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत गयाचे पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे अगोदरच जिल्ह्यात सर्वत्र सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. रॉसह इतर गुप्तचर विभागांना मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआयएस, इंडियन मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटना सभेत हल्ल्यासाठी ड्रोनचाही वापर करू शकतात.

व्यासपीठाला तटबंदी
मोदी ज्या व्यासपीठावरून भाषण करतील त्या व्यासपीठाच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, नॅशनल सिक्युरिटी गार्डकडे सोपवण्यात आली आहे. व्यासपीठाच्या चारही बाजूंना हे जवान तैनात करण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...