आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RJD And JDU Decided To Fight On 100 Seats Each, 40 Seats To Congress

RJD-JDU लढवणार प्रत्येकी 100 जागा; शिव्या देणाऱ्यांना नागपूरला पाठवू-लालू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीतील पक्ष राजद, जदयू, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटप ठरले आहे. बुधवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही घोषणा केली. बिहारच्या 243 सीटों जागांपैकी 100 राजद, 100 जदयू आणि 40 काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीला तीन जागा मिळण्याची आशा आहे. कारण त्यांना दिल्या जाणाऱ्या जागांबाबत निश्चित घोषणा करण्यात आलेली नाही.
पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य केले. शिविगाळ करणाऱ्या आरएसएस वाल्यांना नागपूरला पाठवू असा इशाराच त्यांनी दिला आहे.

नितीश म्हणाले, आमचे जागावाट एकविचाराने झाले आहे. आम्ही एकत्रितपणे विकास कार्यक्रम आखला आहे. सभाही एकत्रित होतील. पहिली सभा 30 ऑगस्टला पाटणाच्या गांधी मैदानावर होईल. त्यात महाआघाडीचे सगळे नेते उपस्थित असतील. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते सीपी जोशी उपस्थित होते.

लालू म्हणाले - भाजप, आरएसएसला देणार आव्हान
लालू यादव म्हणाले, आमच्या आघाडीत बिघाडी असल्याचे भाजपचे लोक म्हणत होते. आमचे जागावाटप होईल असे त्यांना वाटले नव्हते. पण आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरलो आहोत. भाजप आणि आरएसएससमोर आम्ही तगडे आव्हान उभे करणार आहोत. 30 ऑगस्टला आम्ही गांधी मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर देणार आहोत. पंतप्रधानांनी डीएनएचे वक्तव्य करून बिहारचा अपमान केला आहे. त्यांना बिहारची जनता राजकारणात धडा शिकवेल. शिविगाळ करणाऱ्या आसएसएसवाल्यांना नागपूरला पाठवू.