आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजदचा बंद, बिहारमध्ये जनजीवन विस्कळीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय जनता दलाने सोमवारी पुकारलेल्या बिहार बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले. दुकाने, शैक्षणिक संस्थांमध्ये बंद पाळण्यात आला. हातात काठ्या घेतल्याने जमावाने काही ठिकाणी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला.
बंदमुळे सोमवारी व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. कार्यकर्त्यांनी शाळा, महाविद्यालये बंद करण्यास भाग पाडले. राष्ट्रीय महामार्गावर अडथळे टाकून वाहतूक रोखण्यात आली. पाटण्यात राजद
कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिकठिकाणी टायर जाळले हाेते.

कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष
पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ अरविंदकुमार राजक यांनी अनेक भागांत रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचे सांगितले. पाटणा-रांची जनशताब्दी एक्स्प्रेस जहानाबाद स्थानकावर थांबवण्यात आली. जिल्ह्यातील दानियवान स्थानकाजवळ हातिया-इस्लामपूर एक्स्प्रेस अडवण्यात आली. कामतौल रेल्वेस्थानकाजवळही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. लालूप्रसाद यादव यांनी काही दिवसांपूर्वी बंदची घोषणा केली तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले हाेते. मात्र, सोमवारच्या बंदमध्ये कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.