आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजद-जदयूला समसमान जागा, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जागावाटपाची घोषणा केली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजद, जदयू, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपापसात जागावाटप झाले आहे. राजद आणि जदयू प्रत्येकी १०० जागा लढवणार असून काँग्रेसला ४० मतदारसंघ सोडले आहेत. समाजवादी पक्ष महाआघाडीचा घटक पक्ष होणार असेल तर त्यांना लालूंच्या कोट्यातून जागा दिल्या जातील. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यास त्यांना तीन जागा दिल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी राजद अध्यक्ष लालूप्रसाद आणि काँग्रेसचे बिहार प्रभारी सी. पी. जोशी यांच्या उपस्थितीत जागावाटपाची घोषणा केली. आघाडीतील पक्ष संयुक्त प्रचार करतील. ३० ऑगस्ट रोजी गांधी मैदानावर बिहार स्वाभिमान रॅली होणार आहे. सभेस महाआघाडीतील सर्व नेते उपस्थित राहतील. नितीश म्हणाले, आम्ही बिहारींच्या अवमानाचा बदला घेऊ. ज्यांनी संपूर्ण बिहारचा अपमान केला त्यांचीच स्पष्टीकरण देण्याची वेळ आहे. आमच्या डीएनएत दोष नाही हे सांगण्यासाठी बिहारचे लोक आपला डीएनए नमुना पाठवून आव्हान देत आहेत. सत्ता ही आमचीच येणार आहे.
राजद प्रमुख लालू म्हणाले, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शेतापासून खळ्यापर्यंत प्रत्येक स्तरावर आव्हान देऊ. ३० ऑगस्ट रोजीआम्ही गांधी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यंाना उत्तर देऊ. शिवीगाळ करणाऱ्या लोकांना आम्ही नागपूरला पाठवून देऊ. काँग्रेसचे प्रभारी सी. पी. जोशी म्हणाले, बिहारमध्ये जातीय शक्तींना रोखण्यासाठी आम्ही महाआघाडीसोबत बिहारच्या निवडणूक मैदानात उतरणार आहोत. काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व पुढील गोष्टींवर निर्णय घेईल.