आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • RJD Is Not Ready To Fight Election In Nitish Kumars Leadership

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'एकी\'आधीच \'बेकी\': नितीश यांचे नेतृत्‍व आत्मघातकी ठरेल- RJD चे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना (बिहार) - बिहारमध्ये भाजपाच्या विरोधात असणारे पक्ष एकत्र येण्याआधीच विखुरण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर म्हटले आहे की, त्यांचा पक्ष 2015 च्या विधानसभा निवडणुका नितीश कुमारांच्या नेतृत्वात लढू इच्छित आहे. काँग्रेसच्या या वक्तव्यानंतर राजद नेते आणि माजी खासदार रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले की, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणे हे आत्मघातकी ठरेल. लालू यांच्या पक्षाचे नेते असलेल्या रघुवंश यांच्या मते, नितिश कुमार यांना सर्व वर्गातील मतदारांचा पाठिंबा नाही. यापूर्वी जेडीयूने राजदमध्ये विलय होण्याऐवजी आघाडी व्हावे असे म्हटले होते.

जेडीयूने विलयास दिला होता नकार
बिहार विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच रविवारी सत्ताधारी जनता दल (युनाइटेड) ने राष्ट्रीय जनता दल (राजद) बरोबर विलय करण्यास नकार दिला होता. जेडीयूचे बिहार प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह म्हणाले होते की, आता आघाडी होईल. जनता परिवाराच्या महाविलयाचा मुद्दा सध्या तरी टळला आहे. सर्व सहकारी पक्ष आगामी निवडणूक आघाडी करून लढवतील. पक्षाचा प्रचार 18 जूनपासून सुरू होईल.

काँग्रेसच्या मते नितिश कुमार यांनी चांगले काम केले
सूत्रांच्या मते, जेडीयूबरोबर जाण्यामागे काँग्रेसचे असे मत आहे की, मुख्यमंत्री म्हणून नितिश कुमार यांनी चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांनी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी शनिवारी सुमारे अर्धा तास चर्चा केली होती.