आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RJD, JD U Cross Swords Over Law And Order In Bihar

बिहार : राजद-जदयूमध्ये कायदा व्यवस्थेवरून तू तू-मैं मैं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारचा विकास करू, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या राजद आणि जदयूच्या महाआघाडीमध्ये तू तू-मैं मैं सुरू झाले आहे. अभियंत्याच्या हत्येनंतर राज्यातील गुन्हेगारी वाढ आहे त्याला मुख्यमंत्री नितीशकुमार जबाबदार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य राजदचे ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह यांनी केले. त्यावरून सत्ताधाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

राज्यात अलीकडेच एका अभियंत्याची हत्या झाली. त्यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ठीक नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सिंह यांनी म्हटले होते. माजी केंद्रीय मंत्री असलेले सिंह म्हणाले, नितीशकुमार वाहनाच्या पहिल्या आसनावर बसले आहेत. त्यामुळे सरकारच्या कारभाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. कारण राजद गाडीच्या मागील आसनावर आहे. म्हणूनच वाहन सुरक्षितपणे चालवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. जदयूच्या लोकांना नेहमीच जयजयकार ऐकण्याची सवय लागली आहे. परंतु त्यांनी यातून बाहेर पडावे आणि गुन्हेगारीच्या नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वीच राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांनीदेखील राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्याची गरज व्यक्त केली होती. त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले होते, असे सिंह यांनी सांगितले. दरम्यान, लहान मूलही सल्ला देऊ शकते, अशा शब्दांत जदयूचे नेते तथा माजी मंत्री श्याम राजक यांनी रघुवंश प्रसाद सिंह यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

फिजूल में ना बोलें.. लालूंनी कान पिळले
राजदआणि जदयूच्या नेत्यांनी जाहीरपणे भांडू नयेत. ‘फिजूल में ना बोलें असे त्यांनी सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर मीडियाशी बोलताना सुनावले आहे. तुम्हाला मुद्दा समजत नसेल तर शांत राहण्यातच अर्थ आहे. म्हणूनच प्रवक्त्यांनी मुद्दा लक्षात घेऊन वरिष्ठांच्या परवानगीने बोलावे.

काँग्रेसकडून नितीश यांना पाठिंबा, लक्ष घालतील
राज्यातकाही गुन्हेगारीच्या घटना जरूर घडल्या आहेत, परंतु त्यात मुख्यमंत्री लक्ष घालून त्या योग्य पद्धतीने हाताळतील, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे एक घटक पक्ष त्यांच्यासोबत आहे.

नितीशकुमारांना ११ कोटी जनतेने निवडले : जदयू
बिहारमधील११ कोटी नागरिकांनी नितीशकुमार यांचा निवडणुकीच्या माध्यमातून जयजयकार केला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे आघाडीला तीन चतुर्थांश जागी विजय मिळाला आहे याचे विस्मरण होता कामा नये, असे जदयूचे प्रवक्ते नीरजकुमार यांनी म्हटले आहे.