आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉर्निंग वॉकला निघालेल्या RJD नेत्यावर गोळीबार, लालूंनी केली CBI चौकशीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरजेडी नेते केदार राय यांची गुरुवारी तीन अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. - Divya Marathi
आरजेडी नेते केदार राय यांची गुरुवारी तीन अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.
पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि पाटण्याचे नगरसेवक केदार राय यांची गुरुवारी सकाळी हत्या करण्यात आली. केदार सकाळी दानापूर येथील त्यांच्या घरातून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. ते काही फुटांवर गेल्यानंतर बाइकवर आलेल्या तिघांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. केदार यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 
 
भूखंडाच्या वादातून हल्ल्याची शक्यता 
- मिळालेल्या माहितीनुसार, केदार यांच्या कानाजवळ एक गोळी आणि दुसरी छातीत लागली. गोळीबार होताच केदार जमीनीवर कोसळले. गोळीबार करुन शुटर फरार झाले. लोकांनी केदार यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र त्यांना वाचवता आले नाही. 
- पोलिसांनी हत्येचे कारण भूखंडाचे प्रकरण असल्याचा अंदाज वर्तवला आहे. केदार यांच्या हत्येनंतर त्यांच्या घरावर शोककळा पसरली. 
- केदार राय हे मोठे बिल्डर होते. अनेकांशी त्यांचा वाद सुरु होता. त्यांची पत्नी शोभा देवी देखील नगरसेविका आहे. 
- केदार यांचा भाऊ पारस राय याने वकील प्रेम रतन आणि त्याच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप केला आहे. केदार आणि वकील प्रेम रतन यांच्यात दोन प्लॉटवरुन वाद सुरु होता. 
- दानापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी रंजन कुमार म्हणाले, प्रेम रतन आणि त्याच्या दोन भावांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय 18 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. 
 
लालू यादवांनी केली सीबीआय चौकशीची मागणी 
- केदार यांच्या हत्येचा आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले, एका बड्या नेत्याच्या इशाऱ्यावर हत्या झाली आहे. या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. वेळ पडल्यास मी या प्रकरणावर अधिक खुलासे करेल, असेही यादव म्हणाले.
- आरजेडी नेते भाई वीरेंद्र म्हणाले, नितीशकुमारांनी जेव्हापासून आरएसएस आणि भाजपला सोबत घेतले आहे, तेव्हापासून आरजेडी नेते आणि समर्थकांवर हल्ले वाढले आहेत. नितीशकुमार कायद्याचे राज्य असल्याच्या गप्पा मारतात मात्र येथे कोणीच सुरक्षीत नाही. 
 
15 दिवसांमध्ये आरजेडीच्या दुसऱ्या नेत्याची हत्या 
- गेल्या 15 दिवसांमध्ये आरजेडीच्या दुसऱ्या नेत्याची हत्या झाली आहे. 
- 29 जुलै रोजी सीवान येथील बसंतपूरच्या शेखपूरा गावात आरजेडीचे युवा नेते मिन्हाज खान यांच्यावर गोळीबार झाला होता. ते आपल्या घरात झोपलेले असताना हल्लेखोर आले होते. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. मिन्हाज हे शहाबुद्दीनचे निकटवर्तीय मानले जात होते. 
- हल्लेखोर शस्त्रसज्ज होते. घटनास्थळावरुन कार्बाइन, बॉम्ब आणि पेट्रोल बॉम्ब सापडला होता. 
 
पुढील स्लाइडमध्ये केदार यांच्या घरातील आणि बाहेरील दृष्य..
बातम्या आणखी आहेत...