आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी लाटेमुळे चित्रच बदलले, नितीश कुमारांना लालुंची मदत, जेडीयूला बिनशर्त पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना - बिहारच्या राजकारणात गुरुवारी आणखी एक नाट्य घडले. जेडीयूचे कट्टर विरोधक लालू प्रसाद यादव आता त्यांना पाठिंबा देणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार बिहार विधानसभेमध्ये शुक्रवारी विश्वासमतावर मतदान होणार आहे. त्यात लालूंनी जेडीयूला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजदचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनीही यासंदर्भात संकेत दिले आहेत. राजदतर्फे पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

विधानसभेतील गणित

विधानसभेत राजदचे 21 आमदार आहेत. त्यामुळे राज्याच्या जेडीयू सरकारला पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे. 243 सदस्यांच्या विधानसभेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 120 सदस्यांची गरज असते. त्यात जेडीयूकडे त्यांचे स्वतःचे 121 सदस्य आहेत. त्यांनी काँग्रेसच्या 4 आमदारांचे समर्थनही आहे. राजदच्या 21 आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांना 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते आगामी 2015 च्या विधानसभा निवडणुका काँग्रेस, राजद आणि जेडीयू एकत्रितपणे लढवू शकतात.

पुढे वाचा - जदयूमध्ये कुरबूर...