पाटणा - शहरातील दीदारगंज येथे लालू प्रसाद यादव यांच्या सभेत नाराज आरजेडी कार्यकर्त्याने मोठा गोंधळ घातला. कार्यकर्ता एवढा नाराज झाला की त्याने अंगातील शर्ट काढून हवेत भिरकावला. या सभेत लालू यादव यांनी पंतप्रधान मोदींना संघाचा मुखवटा म्हटले.
का बिघडला कार्यकर्ता
ज्या कार्यकर्त्याने भरसभेत अंगातील शर्ट काढले त्याचे नाव भोला आहे. अशी माहिती आहे, की सभेसाठी तयार करण्यात आलेल्या मंचावर निवडक 25 जणांना बसण्याचीच अनुमती होती. लालू यादव सभास्थानाकडे आल्यानंतर यादीतील लोकांशिवाय जे मंचावर होते त्यांना खाली जाण्यास सांगण्यात आले. भोलालाही मंचावरुन खाली उतरवण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या भोलाने भर सभेत गदारोळ सुरु केला. शर्ट काढून हवेत भिरकावले. अनेकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर काही ज्येष्ठांनी हस्तक्षेप केल्यानंतर भोला शांत झाला.
मोदी तर संघाचा मुखवटा
भोलाच्या गोंधळानंतर लालू यादवांचे भाषण झाले. त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. लालू यादव म्हणाले, नरेंद्र मोदी संघाचा मुखवटा आहे. मोदी संघाचेच धोरण राबवत आहेत.
मंचावर 25 जणच का
काही दिवसांपूर्वी जाहीर सभेदरम्यान लालू यादव यांच्या हातावर फॅन पडला होता. तर त्याआधी त्यांचा सभामंच कोसळला होता. दोन्ही वेळेस ते थोडक्यात बचावले. त्यामुळे आता मंचावर फक्त 25 जणांनाच थांबण्याच्या सुचना आहेत. मंचावर कोण बसणार याची यादी आधीच तयार केली जाते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो