आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाच्या कुशीतच बहिणीने तोडला दम, \'एकदा तरी डोळे उघड\' म्हणून करत होता आक्रोश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरधाव ट्रकने बाइकस्वार बहीण-भावाला जोरदार धडक मारली. - Divya Marathi
भरधाव ट्रकने बाइकस्वार बहीण-भावाला जोरदार धडक मारली.
कानपूर - यूपीच्या कानपूरमध्ये एका भरधाव ट्रकने बाइकस्वार भाऊ-बहिणीला धडक मारली. चाकाखाली आल्याने बहिणीचा जागीच मृत्यू झाला. जखमी भाऊ बहिणीच्या डोके हातावर ठेवून तिला उठवण्याचा प्रयत्न करत राहिला, तिच्या मृतदेहाला कवटाळून आक्रोश करत राहिला. तो सारखा म्हणत होता, एकदा डोळे उघडून बघ. पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. ड्रायव्हरलाही अटक करण्यात आली आहे.
 
3 भावांची एकुलती एक बहीण होती राधा
- बिधनूमधील उरियारा गावाचे रहिवासी चंद्रभान शेतकरी आहेत. कुटुंबात पत्नी, मुलगा पवन, संदीप, दीपेश आणि सगळ्यात छोटी मुलगी राधा (11) सोबत राहतात. मृत मुलगी 7व्या इयत्तेत शिकत होती.
- मृत मुलीचे वडील चंद्रभान म्हणाले, मुलीला अनेक दिवसांपासून ताप येत होता. संदीप तिला डॉक्टरांकडे नेत होता. तितक्यात रस्त्यात एका ट्रकने मागून त्यांच्या बाइकला जोरदार धडक दिली. या जबरदस्त धडकेने संदीप दुसरीकडे जाऊन पडला, तर राधा ट्रकच्या चाकाखाली आली.
- घटनास्थळी जमलेल्या लोकांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
काहीच करू शकलो नाही बहिणीसाठी : भाऊ
- संदीप रडतच म्हणाला, माझ्या बहिणीचा माझ्या कुशीतच जीव गेला. तिच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. मी माझ्या बहिणीला वाचवू शकलो नाही. तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही. ती एकुलती एक बहीण होती.
 
काय म्हणतात पोलिस?
- बिधनू पोलिसांतील कृष्णा लाल पटेल म्हणाले, एका अल्पवयीन मुलीचा अपघातात मृत्यू झाला. तिच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. ड्रायव्हरलाही ताब्यात घेतलेले आहे.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...