आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Road Accident In Aurangabad Bihar News In Divya Marathi

PHOTO : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कावड यात्रेकरूंना चिरडले, 12 ठार, 18 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - दुर्घटनेनंतर कवाड यात्रेकरूंचे मृतदेह घेऊन जाणारे नागरिक.

औरंगाबाद (बिहार) - नॅशनल हायवे-2 वर औरंगाबादजवळ एका ट्रॉलीने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कावड यात्रेकरूंना चिरडल्याने 12 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी 18 कावडी गंभीररित्या जखमी आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेले सर्व कावडी देवघरहून जल अर्पण करून परतत होते.

कावडींच्या जत्थ्यातील यात्रेकरू बस रसत्याच्या कडेला उभी करून झोपलेले होते. त्यावेळी रस्त्यावरील एका ट्रॉलीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने या ट्रॉलीने कावडींच्या बसला मागून धडक दिली तसेच झोपलेल्या कावडींना अक्षरशः चिरड़ून टाकले. या दुर्घटनेत 12 कावडींचा जागीच मृत्यू झाला तर 18 गंभीर जखमी आहेत. सर्व यात्रेकरू रोहतासच्या डिहरी ऑन सोन, अकोढीगोला, तेतराधी आणि जवळच्या परिसरातील होते.

घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी डेहरीचे माजी आमदार प्रदीप जोशी यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. अपघातातील जखमींची स्थिती गंभीर आहे. मृतांच्या संख्येबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. ट्रॉलीचा चालक या घटनेनंतर लगेचच फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा अपघातानंतरची काही छायाचित्रे...