आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचे इंजिन चिरत 25 फूट आरपार झाले रेलिंग, कारमध्ये बसलेल्यांची अशी झाली अवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशियारपूर - पंजबामध्ये एक भयानक अॅक्सिडेंट झाला. अतिशय वेगात असलेली एक कार रेलिंगला धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की रस्त्याकडेची रेलिंग गाडीच्या पुढच्या भागातून घुसून इंजिन कापत मागच्या बाजूने 25 फूट बाहेर निघाली. रविवारी झालेल्या या कार अपघातात आई आणि मुलगा जखमी झाले तर मुलगी ठार झाली.
आजारी मुलीला उपचारानंतर घरी घेऊन निघाले होते, असा झाला अपघात
- मिळालेल्या माहितीनुसार, आजारी मुलीला लुधियाना येथील हॉस्पिटलमध्ये दाखवून कुटुंब घरी परत येत होते.
- प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की गाडी ओव्हरस्पिड होती. हायवेवर एका ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला.
- रेलिंगला गाडी एवढ्या जोरात धडकली की इंजिन चिरत रेलिंग 25 फूट मागे निघाली.
- या दुर्घटनेत ड्रायव्हर सीटवरील गुरद्यालसिंग आणि त्यांची 85 वर्षांची आई राजरानी गंभीर जखमी झाल्या.
- राजरानी यांची मुलगी अनिता यांना गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मदतीऐवजी मोबाइलवर फोटो घेत होते लोक
- हायवेवर एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर लोकांनी तत्परता दाखवत त्यांना मदत करण्याऐवजी मोबाइलवर फोटो घेत होते.
- याच मार्गावरुन जात असलेले लष्करी जवान ब्रिजेश कुमार आणि त्यांचा सहकारी शिवराज यांनी तिन्ही जखमींना बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा दुर्घटनेचे थरारक फोटो...
बातम्या आणखी आहेत...