आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरमध्ये चार गुंडांनी बंदूक रोखून लुटले 9 कोटींचे सोने, युको बँकेतूनही लुटले होते 15 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- येथे शुक्रवारी चार गुंडांनी शस्त्रांचा धाक दाखवत मुथूट फायनान्स कंपनीतून तब्बल ३१ किलो सोन्याचे दागिने लुटून नेले. मानससरोवर येथे असलेल्या कंपनीत लुटलेल्या सोन्याची किंमत ९ कोटी रुपये इतकी आहे. सलग दुसऱ्या दिवशी लुटीची घटना घडल्याने जयपूरमध्ये खळबळ माजली आहे. आदर्शनगरातील एका बँकेतून गुंडांनी गुरुवारी १५ लाख रुपये लुटून नेले होते. या दरोड्यात दोन गुंड मोटारसायकलवरून आलेले होते.  

मुथूट फायनान्समध्ये चार गुंड दाखल झाले. त्यांनी कंपनीत शिरताच तेथील कर्मचाऱ्यांवर पिस्तूल राेखले. सर्वांना एका बाजूला रांगेत उभे केले. त्यानंतर मॅनेजरकडे लॉकरची चावी मागितली. मॅनेजरने चावी देण्यास नकार देताच त्यास बेदम मारहाण केली.  मॅनेजरने त्यानंतर चावी त्यांच्या हवाली केली. दोन गुंडांनी लॉकर उघडले आणि त्यातील सोने ताब्यात घेतले. ही घटना इतकी गतीने घडली की, सोने घेऊन काही क्षणात ते पळूनही गेले. काय घडते आहे हे कोणाला कळायच्या आतच दरोडेखोर  पसार झाले होते.  

सीसीटीव्हीमध्ये गुंडांचे चित्रण
कंपनीच्या कार्यालयात  बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये दरोड्याच्या घटनेचे चित्रण झाले आहे. सर्वांचे चेहरे रुमालाने झाकलेले होते. मात्र, एका दरोडेखोराचा चेहरा उघडा होता. आता पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या चित्रणाची तपासणी सुरू आहे. गुरुवारी अादर्शनगरातील एसी मार्केट येथील युको बँकेत गुंडांनी १५ लाखांची रोकड लुटली होती. पोलिसांना अद्याप त्या चोरांचा तपास लागलेला नाही.

अवघ्या २० मिनिटांत झाली लूट  
गुंडांनी इतक्या मोठ्या रकमेच्या सोन्याची लूट अवघ्या २० मिनिटांत केली. एवढा मोठा दरोडा पडूनही आजूबाजूला असे काही घडले असावे याची गंधवार्ताही नव्हती. त्यामुळे कोणी मदतीसाठी आले नाही. गुंड पळून गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले. थोड्याच वेळात पोलिसही तेथे आले. त्यांनी शहरातील सर्व मार्गांवर नाकेबंदी केली.  
बातम्या आणखी आहेत...