आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयपूर : सराफाच्या घरी दरोडा, लुटपाटीनंतर कुटुंबातील महिलेवर केला गँगरेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - तपास करणारे पोलिस.

जयपूर - शहराच्या प्रसिद्ध वैशालीनगर परिसराती शुक्रवारी पहाटे एका सराफाच्या घरावर दरोडा टाकण्यात आला. यावेळी आलेले लुटारू मास्क घातलेले आणि शस्त्रधारी होते. त्यांनी सराफावर चाकूने सुमारे नऊ वार केले. सदस्यांना बांधून ठेवले आणि कुटुंबातील एका महिलेवर गँगरेपही केला. हे सर्व दरोडेखोर सुमारे सव्वातास या घरात होते. त्यानंतर 10 हजार रुपये, 12 तोळे सोन्याचे दागिने आणि सहा मोबाईल घेऊन हे दरोडेखोर फरार झाले.
ते सर्व पळून गेल्यानंतर व्यावसायिकाच्या पाच वर्षांच्या मुलाने बांधलेल्या नातेवाईकांना मुक्त केले. त्यानंतर शेजा-यांच्या मदतीने पोलिसांना कळवण्यात आले. या प्रकारात जखमी झालेल्या बाप लेकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित कुटुंबाच्या घरापासून काही अंतरावरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यात पहाटे 3.06 वाजता एक कार दिसून आली आहे. दरोडेखोर 3.15 वाजता सराफाच्या घरी पोहोचले होते. तर 4.35 वाजता परत निघून गेले. पोलिस याच्या आधारे पुरावे शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.
खिडकीचे ग्रिल उघडून घरात प्रवेश
दरोडेखोर पहाटे सुमारे 3 वाजता सराफाच्या घरात घुसले. त्यांनी शेजारच्या रिकाम्या प्लॉटमधून उड्या मारून प्रवेश केला. त्यानंतर स्वयंपाकघराचे ग्रिल उघडून त्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर दरोडेखोर आत गेले व त्यांनी सर्वांना धमकी दिली. त्यानंतर तिजोरीची किल्ली मागितली. सराफाने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यावर चाकूने वार केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटो...